Ladki Bahen scheme misuse : महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी “लाडकी बहीण योजने”मध्ये एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी तयार केलेल्या या योजनेचा तब्बल 14,298 पुरुषांनी फायदा घेतला. अलिकडच्या सरकारी आढावामध्ये असं दिसून आलं आहे की या घोटाळ्यामुळं राज्याच्या तिजोरीला 21.44 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतला लाभ :
लाडकी बहीण योजना ऑगस्ट 2024 मध्ये सुरु करण्यात आली होती आणि 21 ते 65 वयोगटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्याचं उद्दिष्ट आहे. मात्र, अलिकडच्या लाभार्थी लेखापरीक्षणात असं दिसून आलं आहे की हजारो पुरुष बनावट ओळखपत्रे किंवा कागदपत्रं वापरुन लाभार्थी यादीत सामील झाले होते आणि त्यांना निधी मिळत राहिला.
फसवणुकीमुळं अनेक प्रश्न :
सरकारी आकडेवारीनुसार, योजनेचा आढावा होईपर्यंत या पुरुषांना नियमित पेमेंट मिळत होते. इतक्या मोठ्या संख्येनं पुरुषांनी योजनेसाठी पात्रता तपासणी कशी उत्तीर्ण केली, त्यांचे अर्ज कोणी मंजूर केले आणि प्रणालीमध्ये अशी त्रुटी कशी निर्माण झाली याबद्दल आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची शक्यता (Ladki Bahen scheme misuse )
महिला आणि बालविकास विभागाकडून अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही, परंतु सूत्रांकडून असं सूचित होतं की संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची तयारी सुरु आहे आणि भ्रष्टाचारानं खर्च केलेला निधी वसूल करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होऊ शकते.
हे हि वाचा : ओला उबेर ची अरेरावी संपणार, लवकरच सुरू होणार आता भारत टॅक्सी सर्विस
यापूर्वी उघड झालेल्या अनियमितता :
मात्र, राज्यातील कल्याणकारी योजनांमध्ये अनियमिततेची ही पहिलीच घटना नाही. सॅनिटरी नॅपकिन सबसिडी योजना आणि शिवभोजन थाळी योजनेतही अपात्र लाभार्थ्यांची नोंदणी झाल्याची आणि निधीचा गैरवापर झाल्याची यापूर्वीची प्रकरणं नोंदवली गेली आहेत.
पडताळणी प्रक्रिया आणखी कडक होणार (Ladki Bahen scheme misuse )
सरकार आता हे प्रकरण गांभीर्यानं घेत आहे आणि केवळ दोषींवर कारवाई करण्याच्या दिशेनं वाटचाल करत नाही, तर भविष्यात अशा अनियमितता रोखण्यासाठी योजनेतील पारदर्शकता आणि पडताळणी प्रक्रिया आणखी कडक करण्याची तयारी करत आहे.










