Ladki Bahin Yojana installment update : मुख्यमंञी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबेर महिन्याचा हप्ता अद्यापही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यंदा आचारसंहितेमुळे हा हप्ता मिळणार की नाही असा सवाल त्यांच्याकडून व्यक्त केला जात असून अनेक महिलांमध्ये या कारणाने नाराजी निर्माण झाली आहे. परंतु आता घाबरून जायचे कारण नाही. कारण आता लाडक्या बहीणींसाठी महत्वपूर्ण बातमी आहे.
नोव्हेंबर महिना संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. तरीही लाभार्थी महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात हा हप्ता मिळेल की नाही असा सवाल उपस्थित झाला आहे. परंतु आता महिलांना डबल हप्ता मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे. काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलाना ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते. अनेक महिलांनी ई-केवायसी केली तर बऱ्याच महिलानी ई-केवायसी केली नव्हती. परंतु आता ई केवायसी करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. यामुळे आता ई केवायसी न केलेल्या महिलाना दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी ! पंकजा मुंडे यांच्या पिएला पोलिसांकडून अटक
एकत्र मिळणार दोन्ही हप्ते
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मध्यमातून दर महिन्यात जमा होणार हप्ता जमा न झाल्याने महिला वर्गात नाराजी दिसत आहे. यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांची तारीख घोषित करण्यात आल्यामुळे आचारसंहिता देखील सुरू आहे. या कारणाने नोव्हेंबर महिन्यातील हप्ता जमा होणार की नाही ? असा सवाल महिलांकडून विचारण्यात येत आहे. परंतु आता याबाबत माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याना मिळणाऱ्या हप्त्यांवर निवडणूक आचारसंहितेचा परिणाम होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय जर लाडक्या बहीणींच्या खात्यात नोव्हेंबर महिन्यातील हप्ता जमा न झाल्यास नोव्हेंबेर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते मिळून 3000 रुपये एकदाच जमा करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.म्हणजेच लाभयार्थ्याना एकाच वेळी डबल हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
ई-केवायसी बंधनकारक
परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी ईकेवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. असे असताना देखील जय महिलानी ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुमचं हप्ता रोखण्यात येऊ शकतो. आता सरकारने ई केवायसी करण्याची मुदत वाढवून दिली असून 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच लवकरात लवकर ई केवायसी करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.












