• Home
  • राजकारण
  • मोठी बातमी ! पंकजा मुंडे यांच्या पीएला पोलिसांकडून अटक; आज होणार डॉ. गौरीवर अंत्यसंस्कार
Top News

मोठी बातमी ! पंकजा मुंडे यांच्या पीएला पोलिसांकडून अटक; आज होणार डॉ. गौरीवर अंत्यसंस्कार

Pankaja Munde standing on one side and Gouri Garje standing on the other side in a news-related image

Pankaja Munde PA arrested : काल पंकजा मुंडे यांच्या पीएची पत्नीने वरळी येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. तिने अनेक आरोप प्रत्यारोप तिच्या पतीवर लगावले होते.
आता वरळी पोलिसानी तीन जणांवर गुन्हा दाखल केला असून पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी गर्जे हिने काल राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेनंतर तिच्या माहेरच्या मंडळीकडून ही आत्महत्या नसल्याचे सांगत हत्या असल्याचे आरोप लगावण्यात आले. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली. याप्रकरणी पंकजा मुंडे यांनीही स्पस्ठ  भूमिका घेत पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानंतर आता तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर मध्यरात्रीच्या सुमारास वरळी पोलिसांनी मृत गौरीच्या पती तथा पंकजा मुंडे यांच्या पीए अनंत गर्जेला अटक केली असल्याची माहिती मिळाली आहे.

वरळी पोलिसांच्या पथकाने रात्री 1 वाजता अनंत गर्जेला अटक केली. डॉ. गौरी गर्जे हिने आत्महत्या केल्यानंतर तिला रूग्णालयात स्वत: अनंत गर्जे घेऊन गेले होते. यावेळी त्याने स्वत तिच्या आई वडिलांना फोन करून तिने आत्महत्या केल्याचे कळवले होते. याशिवाय त्याने पंकजा मुंडेंच्या दुसऱ्या एका पीएलाही फोन करून याबाबत माहिती दिली होती. याबाबत पंकजा मुंडे यांनी कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रात उल्लेख केला आहे.

हे ही वाचा : मंत्री पंकजा मुंडेच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या, ही आत्महत्या नाही तर ‘हत्या’ कुटुंबियांचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, अनंत गर्जे याचे किरण इंगळे नावाच्या महिलेसोबत अनंतचे अफेअर सुरू होते. याबाबत गौरील सजले होते. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होऊ लागले. एवढेच नाही तर डॉ.  गौरीने त्याला माफ देखील केले होते. परंतु तो चॅटिंग करत असल्याचे तिच्या पुन्हा लक्षात आले होते. एवढेच नाही तर गौरीला गर्भपाताचा एक रिपोर्ट देखील मिळाला होता. ज्यात पतीच्या नावे अनंत गर्जेचे नाव दिसले होते. याबाबत गौरीने तिच्या कुटुंबियांना माहिती दिली होती.

आज गौरीवर होणार अंत्यसंस्कार

गौरीला अनंत गर्जे बऱ्याचदा मारहाण करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. आता वरळी पोलिसांकडून अनंत गर्जेला 11 वाजता कोर्टात हजर केले जाणार आहे. याशिवाय आज डॉ. गौरी गर्जे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. काल संध्याकाळच्या सुमारास गौरीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला होता.
आज अहिल्यानगर येथील पाथर्डी गावात तिच्यावर अंत्यसंस्कार होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts