Pankaja Munde PA wife suicide case : बीड जिल्हा पुन्हा चर्चेत आला आहे. कारण राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (पीए) अनंत गर्जे यांची पत्नी डाॅ. गौरी यांनी आत्महत्या केली आहे. काल रात्री ही आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. त्यांचे ७ फेब्रुवारी २०२५ रोजी म्हणजे आवघ्या ९ महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. या आत्महत्येमुळे संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
मुलीच्या माहेरकडील कुटुंबिय वरळी पोलिस ठाण्यात पोहोचले असून ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातोय. आमच्या मुलीने आत्महत्या केली नाही तर तिची हत्या करण्यात आलीये… असा दावा कुटुंबियांनी पोलिसांसमोर केला. सध्या पोलिसांकडून या प्रकरणात तपास केला जात आहे. अनंत गर्जे मागील काही वर्षांपासून मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए म्हणून काम करतो. पंकजा मुंडे यांच्यासोबत तो कायमच असतो.
हेही वाचा – संगीत विश्वाला मोठा धक्का! रस्ते अपघातात प्रसिद्ध गायकाचा मृत्यू
अनंत गर्जे याच्या लग्नाला स्वत: पंकजा मुंडे यांनी उपस्थिति लावून वधू-वराला शुभ आशीर्वाद दिले होते. लग्नाच्या अवघ्या काही दिवसात पत्नीने आत्महत्या करून जीवन संपल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी मुलीचे शव ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. कुटुंबिय मोठ्या संख्येने वरळी पोलिस ठाण्यात पोहोचले असून गंभीर आरोप करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील प्राथमिक तपास सुरू केला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला.
📍बीड.
माझ्या पुत्रासमान, माझा स्वीय सहाय्यक चि. अनंत गर्जे याचा आज शुभ विवाह पार पडला. चि. सौ.कां. डाॅ.गौरी सारखी सुंदर आणि सुशील सहचारिणी त्याला मिळाली. आज बीड येथे या दोघांच्या शुभ विवाह सोहळ्यात माझी आई, डॉ.प्रितमताई यांचेसह उपस्थित राहून नव वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले.… pic.twitter.com/y69QatGw41
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 7, 2025
अंनंत गर्जे आणि त्याची पत्नी गौरी या दोघांमध्ये काल दुपारी एक वाजल्यापासून भांडण सुरू होते. रात्री आठ वाजता मुलीच्या वडिलांना तिच्या पतीने फोन केला, नंतर आईला फोन केला. माझ्या समोर तुमच्या मुलीचे फाशी घेतली आहे आणि ती गेलीय. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला रुग्णालयात सोडून तो निघून गेला. त्याच्या खाजगी गोष्टी तिला माहिती झाल्या होत्या म्हणून तो तिला त्रास देयचा, अशी माहिती मृत मुलीच्या मामाने दिली आहे.
आत्महत्या झाली तेव्ही मी घरी नव्हतो. घरी पोहोचलो तेव्हा दरवाजे आतून बंद होते. ३१ व्या मजल्यावरून खिडकीतून उतरून ३०व्या मजल्यावरील घरात आलो. घरात आल्यावर गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती. गळफास घेतलेल्या अवस्थेतून खाली उतरून गौरीला रुग्णालयात घेऊन गेलो, असे स्पष्टीकरण अनंत गर्जे यांनी दिलं आहे.
शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर नक्की काय घडले हे स्पष्ट होईल. याबाबत अजून मंत्री पंकजा मुंडे यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. पंकजा मुंडे नेमके काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत. पंकजा मुंडे यांचा पीए म्हणून अनंत गर्जे मागील काही वर्षांपासून काम करतो. मात्र, या आत्महत्येनंतर आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याच्यावर गुन्हा दाखव व्हावा, याकरिता मुलीचे कुटुंबिय आग्रही आहेत. या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचे आजचे सर्व नियोजित दौरे रद्द केल्याची माहिती मिळतंय. पोलिसांनी या प्रकरणात अजून गुन्हा दाखल करून घेतला नाहीये. तपास सध्या सुरू आहे. आत्महत्येचे कारक काय याचा शोध घेतला जातोय.












