Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • बिबट्याने अचानकपणे झडप घातल्याने मोटरसायकलस्वार जखमी; थोडक्यात बचावला
Top News

बिबट्याने अचानकपणे झडप घातल्याने मोटरसायकलस्वार जखमी; थोडक्यात बचावला

Motorcyclist injured after sudden leopard attack in forest area

Leopard attack on motorcyclist : रत्नागिरी येथील लांजा याठिकाणी बिबट्याने अचानक मोटारसायकलस्वरावर झेप घेतल्याची घटना घडली आहे. मोटारसायकलस्वाराने बिबट्याचा हल्ला चुकवण्यासाठी प्रयत्न केला असता, मोटारसायकल घसरली आणि तोल जाऊन मोटारसायकलस्वार खाली पडल्याने तो जखमी झाला. परंतु या घटनेत बिबट्याच्या हल्ल्यातून हा व्यक्ती बचावल्याची माहिती समोर आली आहे.

घटना कुठे घडली

रत्नागिरी येथील लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कुवे गावातील घोडखिंड याठिकाणी बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय हे संपूर्ण प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार, कुवे माळवाडी येथे राहणारा योगेश सुधीर पवार हा बुधवारी सायंकाळी आपले काम आटोपून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटर सायकलने घरी चालला होता. कुवे घोडखिंड या ठिकाणी तो आला असता या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे त्याच्या दिशेने झेप घेतली. यामुळे अचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे मोटरसायकलस्वार योगेश पवार हा घाबरून गेला. परंतु प्रसंगावधान राखून बिबट्यापासून वाचवण्यासाठी त्याने स्वतःला मोटारसायकलवर स्वतः ला झोकून दिले. तर त्याच्या पाठीमागे असलेल्या बॅगेमुळे बिबट्याच्या हल्ल्यापासून तो बालमबाल बचावला. परंतु मोटरसायकल घसरून पडल्याने तो जखमी झाला.‌ त्यानंतर बिबट्याने जंगलाकडे धूम ठोकली.

हे ही वाचा : मनसेला शिवडी मध्ये धक्का; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे कट्टर समर्थक यांचा पक्षाला “जय महाराष्ट्र”

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

या घटनेत योगेश पवार याच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. मात्र अशाप्रकारे बिबट्याने मोटरसायकल स्वारावर केलेल्या हल्ल्यामुळे कुवे गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts