महाराष्ट्रात दरवर्षी हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या अहवालात महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात जास्त आत्महत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे निदर्शनास आहे. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
गृह मंत्रालयाने दिलेल्या NCRB अहवालानुसार 2023 मध्ये 10 हजार 786 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. त्यापैकी यामध्ये 4 हजार 690 शेतकरी तर 6 हजार 96 शेतमजूरांचा यामध्ये समावेश आहे. त्यानुसार देशातील एकूण आत्महत्याग्रस्तांच्या तुलनेत 1 लाख 71 हजार 418 म्हणजेच 6.3 टक्के एवढी आहे. कर्नाटकात ही टक्केवारी 22.5% एवढी आहे.
शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीनुसार या घटनेला नेमकं जबाबदार आहे तरी कोण ? याचा विचार केल्यास शेतकरी संघटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारी धोरणांना जबाबदार धरले आहे. तसेच कापसावरील आयात शुल्क माफ करण्याच्या निर्णयामुळे देखील परिस्थिती आणखी बिकट होईल अशी भीती शेतकरी संघटनांनी व्यक्त केली आहे. कारण बऱ्याच आत्महत्या या अजूनही देशातील कापूस पट्ट्यातून होत आहेत.
शेतकरी आत्महत्येमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर आंध्र प्रदेश 8.6 टक्के, मध्य प्रदेश 7.2 टक्के, आणि तामिळनाडू मध्ये 5.9 टक्के सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, झारखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, चंदीगड, दिल्ली आणि लक्षद्वीपमध्ये कृषी क्षेत्रातून एकही आत्महत्या न झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
कृषी क्षेत्रातील 10 हजार 786 आत्महत्यांपैकी 4 हजार 690 शेतकरी होते, तर 6 हजार 96 शेतमजूर होते. 2023 मध्ये देशात झालेल्या एकूण आत्महत्यांपैकी 1 लाख 71 हजार 418 म्हणजे 6.3 टक्के आत्महत्या या कृषी विषयक होत्या. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी म्हणजे 4 हजार 690 शेतकऱ्यांपैकी 4 हजार 553 पुरुष तर 137 महिला होत्या. आणि शेतमजुरांनी केलेल्या आत्महत्यांपैकी म्हणजे 6 हजार 96 पैकी 5 हजार 433 तर 663 महिला होत्या.












