Maharashtra Weather Today : आज वातावरणात बदल झाला आहे. सध्या वातावरण सतत बदलत असून अनेक भागात कडाक्याची थंडी पडल्याचे दिसून येत आहे. त्यानुषंगाने भारतीय हवामान खात्याने मोठा अंदाज वर्तवला आहे. राज्यात आज सकाळपासून वातावरणात बदल जाणवत असून पाऊस थंडी उकाडा असं तिन्ही ऋतूंचे मिश्रण दिसत आहे. या बदलामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत असून सर्दी खोकला ताप आणि श्वसनासंबंधित आजार उद्भवण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक शहरांमध्ये सध्या वायू प्रदूषण होत असून थंडीचा पार घसरताना दिसून येत आहे.
2 दिवस जास्त गारठा वाढणार
भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येणाऱ्या काही दिवसात वातावरणात चढउतार बघायला मिळू शकतो. यासह काही दिवसात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात थंडी प्रचंड वाढली होती. परंतु जानेवारी महिन्यात थंडी जास्त नसून पुढील दोन ते तीन दिवसात थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर येथे गॅंगवॉर; पाण्याच्या टाकीत लपून बसलेल्या एकासह 7 आरोपींना अटक
पुण्यात दोन ते 3 दिवसांपासून तापमानात मोठी घट झाल्याचे बघायला मिळाले. येणाऱ्या 2 दिवसात पुण्यातील वातावरणात आणि कमाल किमान तापमानात बदल होण्याची शक्यता नाही. त्यानुषंगाने आता शहरात 2 दिवस जास्त गारठा वाढणार असून वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर दिशेकडून येणाऱ्या शीतललहरींमध्ये वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. काही दिवसात आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून काही भागात गारठा कमी होण्याचा अंदाज आहे.
दुपारच्यावेळात उकाडा जाणवू शकतो
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात अनेक भागांमध्ये आज ढगाळ वातावरण दिसून येईल. दुपारच्यावेळात उकाडा जाणवू शकतो. एवढेच नाही तर बऱ्याच भागात पाऊस तर कधी थंडी अशी दुहेरी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. निफाडमध्ये 7.9 अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर गोदिंया येथे 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यासह धुळ्यात 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून राज्यातील गारठा सतत कमी जास्त होताना दिसून आला.












