Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवा, अन्यथा कारवाई होणार; शिक्षण विभागाचे निर्देश
ताज्या बातम्या

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवा, अन्यथा कारवाई होणार; शिक्षण विभागाचे निर्देश

Marathi Teaching Mandatory in Schools

Marathi Teaching Mandatory in Schools : महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन सक्तीचे करण्याबाबतचा कायदा अस्तित्वात असूनही, अनेक शाळा या निर्णयाची अंमलबजावणी करत नसल्याचे निदर्शनास आले होते. यासंदर्भात ५ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या या निवदनाची शिक्षण विभागाने दखल घेतली असून राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यात आले आहे. या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी परिपत्रक काढले असून विभागीय शिक्षण उपसंचालकांना यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.

हेही वाचा – जळगावात हृदयद्रावक घटना! दोन मुलींना माथेफिरूने विहिरीत ढकलले, गावकरी संतप्त

“आज आनंद वाटतोय की, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. राज्यातील ज्या शाळा मराठी भाषेच्या अध्यापनाचा निर्णय डावलत आहेत, त्यांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहेत. प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेचं आम्ही स्वागत करतो. मराठी ही केवळ एक भाषा नसून ती आपली ओळख आहे. आपल्या मातीत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी भाषा आलीच पाहिजे, ही आमची भूमिका होती आणि राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर योग्य ती कार्यवाही होईल आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, ही आमची अपेक्षा आहे,” अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिली आहे.

शासनाने राज्यभरातील सर्व शासकीय व खाजगी शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे बंधनकारक असल्याचा स्पष्ट शासन अधिनियम (२०२०) निर्गमित आहे. परंतु, अत्यंत खेदाची बाब म्हणने अनेक खाजगी तसेच काही नामांकित बोर्डाच्या (ICSE, CBSE, IB) शाळा हा निर्णय सर्रासपणे पायदळी तुडवत आहेत. महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा मंडळांचे अभ्यासक्रम असलेल्या, सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे आहे. त्यानंतर आता विभागीय शिक्षण उपसंचालक यांना निर्देश देण्यात आले आहेत की, निवेदनाच्या अनुषंगाने आवश्यक ती तपासणी करण्यात यावी व याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल शासनास सादर करण्यात यावा, असे या परिपत्रकाद नमूद करण्यात आले आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts