Narendra Modi and Rahul Gandhi Meet: दिल्लीत महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एक विशेष क्षण पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी कारमधून उतरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर नेत्यांना नमस्कार करत थोडा वेळ थांबून संवाद साधताना दिसले. या अनपेक्षित भेटीने कार्यक्रमात उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत संसदेत आयोजित कार्यक्रमात एक महत्वाचा क्षण पाहायला मिळाला. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची अनपेक्षित भेट झाली.
हेही वाचा: “महिला सचिव नको” म्हणत मंत्र्याने डावलल्याचा अनुभव; मनीषा म्हैसकर यांनी केला मोठा खुलासा
यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अभिवादन करत थोडा वेळ संवादही साधला. या क्षणामुळे उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांच्यासह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संसदेत महात्मा फुले यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचे अभिनंदन केले.
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यांच्या सामाजिक कार्याचे स्मरण करण्यात येत आहे.











