Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • मिनाबमध्ये ठार झालेल्या 168 मुलांचे फोटो, दप्तरं आणि बूटासह इराण इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी दाखल; जगभरात चर्चेला उधाण
ताज्या बातम्या

मिनाबमध्ये ठार झालेल्या 168 मुलांचे फोटो, दप्तरं आणि बूटासह इराण इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी दाखल; जगभरात चर्चेला उधाण

मिनाबमध्ये ठार झालेल्या 168 मुलांचे फोटो, दप्तरं आणि बूटासह इराण इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी दाखल; जगभरात चर्चेला उधाण

Iran US Peace Talks : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं शांतता चर्चेत सहभागी होण्यासाठी इराणनं अवलंबलेल्या अनोख्या पद्धतीमुळं जगाला धक्का बसला आहे. अमेरिकेसोबतच्या शांतता चर्चेत सहभागी होण्यासाठी इराणचं शिष्टमंडळ शनिवारी इस्लामाबादमध्ये दाखल झालं. यावेळी त्यांनी इस्रायली आणि अमेरिकन हल्ल्यांमध्ये ठार झालेल्या 168 मुलांचे फोटो, त्यांच्या शाळेच्या बॅगा आणि बूट विमानाच्या आसनांवर ठेवले, ज्यामुळं सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दाखल होण्यापूर्वी इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी एक भावनिक आणि प्रतिकात्मक संदेश दिला.

हेही वाचा : इराण-अमेरिका शस्त्रसंधी चर्चा वाढणार; नेतान्याहू यांची लेबनॉनसोबतच्या चर्चेला मंजुरी

गालिबाफ यांनी विमानाच्या आतील भागाचा फोटो केला पोस्ट :

इस्रायल आणि अमेरिकेला बालहत्यारे म्हणून चित्रित करण्यासाठी, इराणनं इस्लामाबादला जाणाऱ्या इराणी शिष्टमंडळाच्या विमानातील आसनं तेहरानच्या मिनाब हल्ल्यात ठार झालेल्या 168 शाळकरी मुलांचे फोटो, त्यांच्या शाळेच्या बॅगा आणि बूट यांनी सजवली. शांतता चर्चेपूर्वी इस्रायल आणि अमेरिकेच्या या कृत्याकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी इराणनं हा एक निषेध म्हणून सादर केला. शनिवारी अमेरिका-इराण शांतता चर्चा सुरु होण्यापूर्वी, इराणचे संसद अध्यक्ष गालिबाफ यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या विमानातून एक फोटो शेअर करुन खळबळ उडवून दिली. या फोटोमध्ये मिनाब हल्ल्यात ठार झालेल्या 168 शाळकरी मुलांचे फोटो, रक्तानं माखलेली दप्तरं, बूट आणि रिकाम्या जागांवर ठेवलेली पांढरी फुले दिसत होती.

गालिबाफ लिहिली एक भावनिक पोस्ट :

मिनाबमध्ये ठार झालेल्या 168 शाळकरी मुलांचे फोटो, त्यांच्या रक्तानं माखलेली दप्तरं आणि बुटांनी विमानातील जागा सजवल्यानंतर, गालिबाफ यांनी ‘एक्स’वरील पोस्टला “या प्रवासातील माझे सोबती” असं कॅप्शन दिले. ही भावनिक पोस्ट 28 फेब्रुवारी रोजी इराणच्या मिनाबमधील शजारेह तयबा प्राथमिक शाळेवर झालेल्या इस्रायली आणि अमेरिकन हल्ल्यांच्या स्मरणार्थ आहे, ज्यात या सर्व शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तेहराननं या हल्ल्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरलं आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं शाळकरी मुलं आणि कर्मचारी यांच्यासह किमान 165-168 लोक ठार झाले आणि 100 हून अधिक जखमी झाले. इराणी शिष्टमंडळाला ‘मिनाब 168’ असं नाव देण्यात आलं आहे. गालिबाफ यांच्या या प्रतिकात्मक कृतीचा उद्देश चर्चेतील इराणची मजबूत भूमिका दर्शवणं आणि शहीद झालेल्या मुलांची स्मृती जिवंत ठेवणं हा आहे. शांतता चर्चेदरम्यान मिनाबच्या निष्पाप शहीदांना विसरलं जाणार नाही, असा स्पष्ट संदेश ते देत आहेत.

जेडी व्हान्स आणि इराणी अधिकाऱ्यांची पाकिस्तानात भेट :

इस्रायल-इराण युद्धाच्या चाळीस दिवसांनंतर, अमेरिका आणि इराण यांच्यातील पहिली उच्चस्तरीय शांतता चर्चा इस्लामाबादमध्ये होणार आहे. उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल झालं आहे. शनिवारी सुरु होणाऱ्या या चर्चेसमोर अनेक आव्हानं आहेत, कारण दक्षिण लेबनॉन सीमेवर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात गोळीबार सुरू आहे आणि इराणनं चर्चा सुरू करण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत, ज्यात लेबनॉनमधील हल्ले थांबवण्याचा समावेश आहे. इराणचं शिष्टमंडळ शनिवारी पहाटे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं दाखल झाले. संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केलं. त्यांनी सांगितलं की, जर इस्रायलनं लेबनॉनमध्ये युद्धविराम जाहीर केला आणि इराणची जप्त केलेली मालमत्ता सोडली, तरच चर्चा होईल.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला. यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला. त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या. सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts