• Home
  • देश
  • इराण-अमेरिका चर्चेची दुसरी फेरीही निष्फळ! ट्रम्प यांनी इस्लामाबादला पाठवला नाही कोणताही प्रतिनिधी
ताज्या बातम्या

इराण-अमेरिका चर्चेची दुसरी फेरीही निष्फळ! ट्रम्प यांनी इस्लामाबादला पाठवला नाही कोणताही प्रतिनिधी

donald trump

Iran US Peace Talks : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या चर्चेसाठी आपले प्रतिनिधी इस्लामाबादला पाठवण्यास नकार दिला आहे. दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे पाकिस्तानी फील्ड मार्शल आसिम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेऊन तेहरानला परतले आहेत. परिणामी, चर्चेची दुसरी फेरीसुद्धा अयशस्वी ठरली आहे.

हेही वाचा : वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये डिनर कार्यक्रमात गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले

ट्रम्प यांनी आपले प्रतिनिधी इस्लामाबादला न पाठवण्यामागचं कारण केलं स्पष्ट :

ट्रम्प यांनी सांगितलं की, त्यांनी आपले प्रमुख प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांना इराणसोबतच्या चर्चेसाठी पाकिस्तानला न जाण्याचे निर्देश दिले आहेत. फॉक्स न्यूजला दिलेल्या निवेदनात ट्रम्प म्हणाले, “त्यांना (इराणींना) जेव्हा पाहिजे तेव्हा ते आम्हाला बोलावू शकतात.” इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी म्हटलं आहे की, जोपर्यंत त्यांच्या बंदरांवरील नाकेबंदी कायम राहील, तोपर्यंत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही. शनिवारी रात्री पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी फोनवर बोलताना पेझेश्कियन म्हणाले की, चर्चेची नवीन फेरी होण्यापूर्वी अमेरिकेनं नाकेबंदीसह सर्व कार्यात्मक अडथळे प्रथम दूर केले पाहिजेत. ही माहिती इराणच्या आयएसएनए (ISNA) आणि तस्निम (Tasnim) या वृत्तसंस्थांनी दिली आहे. दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची शनिवारी संध्याकाळी पाकिस्तानहून रवाना झाले.

ट्रम्प प्रशासनानं 40 चिनी कंपन्यांवर निर्बंधही लादले :

ट्रम्प यांनी गुरुवारी जाहीर केलं की, व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या चर्चेनंतर इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील शस्त्रसंधी तीन आठवड्यांसाठी वाढवण्यास इस्रायली आणि लेबनीज सहमत झाले आहेत. या महिन्यात दोन्ही देशांमधील हा दुसरा उच्चस्तरीय संवाद होता. मूळ 10 दिवसांची शस्त्रसंधी सोमवारी संपणार होती. ट्रम्प प्रशासनानं चीनमधील एका प्रमुख तेल शुद्धीकरण कारखान्यावर आणि इराणी तेलाची वाहतूक करणाऱ्या सुमारे 40 जहाज कंपन्या व टँकर्सवर आर्थिक निर्बंध लादले आहेत.

युद्धामुळं विमानं रद्द :

शुक्रवारी जाहीर करण्यात आलेलं हे पाऊल, इराणच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या तेल निर्यातीला रोखण्यासाठी, इराणसोबत व्यवसाय करणाऱ्या संस्थांवर दुय्यम निर्बंध लादण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या धमकीचा एक भाग आहे. मध्य पूर्वेतील सुरु असलेल्या युद्धामुळे जगभरातील विमान कंपन्या उड्डाणं रद्द करत आहेत, ज्यामुळं जेट इंधनाच्या पुरवठ्यात व्यत्यय येत आहे आणि किमती वाढत आहेत. तज्ञांनी प्रवाशांना त्यांचं विमान रद्द झाल्यास काय करावं हे सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts