• Home
  • बिजनेस
  • 4 मे नंतर डिझेल आणि पेट्रोलच्या दरात वाढ होणार? केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी म्हणाले…
ताज्या बातम्या

4 मे नंतर डिझेल आणि पेट्रोलच्या दरात वाढ होणार? केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी म्हणाले…

petrol pump

Petrol Diesel Price Hike : पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. आता सर्वजण 4 मे ची वाट पाहत आहेत. 4 मे रोजी मतमोजणी होईल आणि त्या राज्यांमध्ये नवीन सरकार स्थापन होईल. दरम्यान, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यानं सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसणार असल्याची बातमी समोर येत आहे.

हेही वाचा : पश्चिम बंगालमध्ये भाजपला धक्का? TMC च्या अंतर्गत सर्व्हेने बदलले चित्र,

डिझेल आणि पेट्रोलच्या दरात वाढ होणार? :

विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर, देशात डिझेल आणि पेट्रोलच्या दरात लक्षणीय वाढ होऊ शकते, असं वृत्त अनेक माध्यमांनी दिलं आहे. या बातमीमुळं सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. कारण इराण-अमेरिका आणि इस्रायल संघर्षाच्या काळात लोकांना घरगुती गॅसबाबत मोठ्या चिंतेचा सामना करावा लागला होता. आता, डिझेल आणि पेट्रोलच्या दरात संभाव्य वाढ होण्याची बातमी अधिकच चिंताजनक बनली आहे.

किती होऊ शकते दरवाढ :

माध्यमांच्या वृत्तानुसार, तेल कंपन्यांना मोठा तोटा होत आहे. या पार्श्वभूमीवर, सरकार इंधनाच्या दरात सुधारणा करण्याचा गांभीर्यानं विचार करत आहे. वृत्तानुसार, डिझेल आणि पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 4 ते 5 रुपयांनी वाढ होऊ शकते. तेलाच्या दरवाढीचा थेट परिणाम रस्ते वाहतुकीवर होईल. यामुळं भाजीपाला आणि दुधासारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती वाढू शकतात.

काय म्हणाले पेट्रोलियम मंत्री :

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या वृत्तांदरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी शुक्रवारी एक निवेदन जारी करुन सांगितलं की, जागतिक ऊर्जा बाजारातील चढ-उतार असूनही, भारतानं 4 वर्षे आणि 60 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. युद्ध, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीसह भू-राजकीय तणावामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्रावर परिणाम झाला आहे. असं असूनही, देशात स्थिरता टिकवून ठेवण्यात आली आहे. देशात गेल्या चार वर्षे आणि साठ दिवसांपासून इंधनाच्या किरकोळ दरात वाढ झालेली नसल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, शेजारील देशांमध्ये इंधनाच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून, काही ठिकाणी ही वाढ 39 ते 66 टक्क्यांपर्यंत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts