Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • पश्चिम बंगालमध्ये भाजपला धक्का? TMC च्या अंतर्गत सर्व्हेने बदलले चित्र, नेमकं काय घडलं…
Top News

पश्चिम बंगालमध्ये भाजपला धक्का? TMC च्या अंतर्गत सर्व्हेने बदलले चित्र, नेमकं काय घडलं…

West Bengal Election: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकितच्या निकालापूर्वी राजकीय वातावरण तापले असताना एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस All India Trinamool Congress (TMC) च्या अंतर्गत सर्व्हेनुसार सत्ताधारी पक्ष पुन्हा मजबूत स्थितीत असल्याचा दावा केला जात आहे. या अंदाजामुळे भारतीय जनता पार्टीसाठी आव्हान वाढण्याची शक्यता व्यक्त्त होत आहे.

राज्यात यंदा सुमारे ९२ टक्के मतदान झाले असून, इतक्या मोठ्या मतदारानानंतर निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विविध बाह्य सर्व्हे वेगवेगळे अंदाज दर्शवत असले, तरी TMC च्या अंतर्गत विश्लेषणात पक्षाला स्पष्ट आघाडी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: मुंबई-पुणे सुसाट रस्ता, दमदार ड्राइव्ह; पाहा देवेंद्र फडणवीसयांचा ‘मिसिंग लिंक’वर खास अंदाज!

मिळालेल्या माहितीनुसार, TMC ने बूथस्तरावरून मिळालेल्या डेटाचे सखोल विश्लेषण केले आहे. या विश्लेषणानुसार, पक्षाची जागा काहीशी कमी झाली तरीही ते सुमारे १७० पेक्षा अधिक जागा जिंकू शकतात. म्हणजेच, दोन- तृतीयांश बहुमतासह पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यात येत आहे.

तसेच, एकूण २९४ जागांपैकी सुमारे ४० ते ४५ जागांवर काट्याची लढत असल्याचे मागले जात आहे. या ‘ग्रे झोन’ साईट्सवर निकाल कोणत्याही बाजूला झुकू शकतो. मात्र, थोडीसेही वातावरण अनुकूल ठरल्यास TMC या जागांवर आघाडी घेऊ शकते, असा अंदाज व्यक्त कारण्यात आला आहे.

या सर्व्हेनुसार BJP साठी परिस्थिती काहीशी कठीण दिसत असून, पक्षाला 70 च्या आसपासच जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतर होण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

https://x.com/AITCofficial/status/2049940928262242397?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2049940928262242397%7Ctwgr%5E16cde337f4a4fe8c9f9a8d456a7eec3c753e5d8a%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsarkarnama.esakal.com%2Fdesh%2Ftmc-internal-survey-claims-strong-return-to-power-west-bengal-vs-bjp-rm89

दरम्यान, TMC च्या सूत्रांचे म्हणणे आहे की, यंदाच्या निवडणुकीत ‘सायलेंट व्होटर’ निर्णायक ठरला. विशेषतः महिला आणि अल्पसंख्याक मतदारांनी Mamata Banerjee यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचा दावा करण्यात आला आहे. महिलांसाठी राबवण्यात आलेल्या आर्थिक योजनांनाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जाते.

एकूणच, अधिकृत निकाल येण्याआधीच या अंतर्गत सर्व्हेमुळे राजकीय समीकरणांवर चर्चा रंगली असून, आता सर्वांचे लक्ष निकालाच्या दिवसाकडे लागले आहे.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts