Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • बारावीचा निकाल आज जाहीर; राज्यात यंदाही कोकण विभागाने मारली बाजी, तर पुन्हा लातूर पॅटर्न फेल
Pune

बारावीचा निकाल आज जाहीर; राज्यात यंदाही कोकण विभागाने मारली बाजी, तर पुन्हा लातूर पॅटर्न फेल

12th Result 2026 1

Maharashtra HSC Result 2026: नुतकाच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील ९ विभागीय मंडळांमध्ये पुन्हा कोकण विभागाने बाजी मारली असून लातूर पॅटर्न फेल झालं आहे. यावर्षी कोकण विभागाचा निकाल ९४.१४ टक्के इतका निकाल लागलाय.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या बारावी ( इयत्ता १२ वी) परीक्षा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. फेब्रुवारी – मार्च २०२६ मध्ये पार पडलेल्या या परीक्षेचा एकूण निकाल यंदा ८९.७९ % इतका लागला आहे. पत्रकार परिषदेत बोर्डाने सविस्तर आकडेवारी जाहीर करत विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला.

हेही वाचा: मुंबई-पुणे सुसाट रस्ता, दमदार ड्राइव्ह; पाहा देवेंद्र फडणवीसयांचा ‘मिसिंग लिंक’वर खास अंदाज!

यंदाच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले असून या विभागाचा निकाल ९४. १४% इतका नोंदवला गेला आहे. तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी, ८४.१४% इतका लागला आहे. इतर विभागांचे निकालही लवकरच सविस्तरपणे जाहीर करण्यात येणार आहेत.

गेल्या वर्षी २०२५) बारावीचा निकाल ९१.८८ % होता. त्याच्या तुलनेत यंदा निकालात २.०९ % घट झाल्याचे दिसून आले आहे.

मुलींची पुन्हा मारली बाजी

यंदाही निकालात मुलींनी आपली आघाडी कायम ठेवली आहे.

मुलींची उत्तीर्ण टक्केवारी: 93.15%
मुलांची उत्तीर्ण टक्केवारी: 86.80%

म्हणजेच, मुली पुन्हा एकदा मुलांपेक्षा लक्षणीय आघाडीवर आहेत.

किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?

यंदा राज्यभरातून सुमारे 14 लाख 33 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या सर्व विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतीक्षा आज संपली.

निकाल कुठे पाहाल?

विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून खालील अधिकृत वेबसाईट्सवर निकाल पाहता येईल:

mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
mahahsscboard.in

तसेच DigiLocker वरूनही डिजिटल गुणपत्रिका डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts