Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मुंबई-पुणे सुसाट रस्ता, दमदार ड्राइव्ह; पाहा देवेंद्र फडणवीसयांचा ‘मिसिंग लिंक’वर खास अंदाज!
ताज्या बातम्या

मुंबई-पुणे सुसाट रस्ता, दमदार ड्राइव्ह; पाहा देवेंद्र फडणवीसयांचा ‘मिसिंग लिंक’वर खास अंदाज!

devendra fadanvis

Mumbai Pune Missing Link Devendra Fadanvis: मुंबई- पुणे या दोन महत्वाच्या शहरांना जोडणाऱ्या प्रवासात मोठा बदल घडवून आणणाऱ्या “मिसिंग लिंक” या प्रकल्पाचे भव्य उदघाटन काल १ मे २०२६ रोजी पार पडले. या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील उपमुख्यमंत्री उपस्थित होते. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला हा प्रकल्प आता नागरिकांसाठी खुला झाला असून, प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.

या बहूप्रतिक्षित मार्गाच्या उदघाटनवेळी देवेंद्र फडणवीस यांनी यांनी स्वतः गाडी चालवत या नव्या मार्गावरून प्रवास केला. त्यांनी Mercedes-AMG G63 या आलिशान आणि शक्तिशाली SUV चे स्टेअरिंग हातात घेत एक वेगळाच अंदाज दाखवला. सुसाट वेग, अत्याधुनिक सुविधा आणि जागतिक विक्रम करणारे बोगदे यामुळे हा प्रकल्प केवळ रास्ता न राहता महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाचा नवा टप्पा ठरत आहे.

हेही वाचा: आज दुपारी १ वाजता पाहता येणार बारावीचा निकाल; कुठं अन् कसा पाहायचा जाणून घ्या एका क्लिकवर!

या प्रकल्पाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी “हा आता मिसिंग लिंक नसून कनेक्टिंग लिंक आहे,” असे सांगत त्याचे महत्त्व अधोरेखित केले. या मार्गामुळे मुंबई-पुणे प्रवास अधिक सुलभ होणार असून घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

या प्रकल्पातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज बोगदे, त्यापैकी एका बोगद्याने तब्बल २३.५ मीटर रुंडमुळे जगातील विक्रम प्रस्थापित केला आहे. या कामगिरीची नोंद Guinness World Records मध्ये करण्यात आली असून उद्घाटनावेळी त्याचे प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले.

हा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प Mumbai–Pune Expressway वरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या दरम्यान विकसित करण्यात आला आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, तसेच वाहनचालकांना सुरक्षित आणि आरामदायी अनुभव मिळेल.

एकूणच, या प्रकल्पामुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर राज्याच्या आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे. सुधारित दळणवळणामुळे उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts