Nanded Panipat special train : दिल्लीत आयोजित 78व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय निरंकारी संत समागमाच्या निमित्तानं प्रवाशांच्या सोयीसाठी, रेल्वे प्रशासनानं नांदेड आणि पानीपत दरम्यान दोन फेऱ्या असलेल्या विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. ही विशेष ट्रेन आठवड्यातून दोन वेळा 29 ऑक्टोबर आणि 3 नोव्हेंबर रोजी नांदेडहून आणि 30 ऑक्टोबर आणि 4 नोव्हेंबर रोजी पानीपतहून धावेल.
हे हि वाचा : Silver Gold Price Fall : चांदीची किमती विक्रमी उच्चांकावरुन 21% नं घसरली; सोनंही 7.46% नं स्वस्त
रेल्वेचं सविस्तर वेळापत्रक :
ट्रेन क्रमांक 07635 नांदेड-पानिपत विशेष ट्रेन बुधवार आणि शनिवारी सकाळी 07.40 वाजता नांदेडहून निघून परभणी, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, झांसी, मथुरा आणि नवी दिल्ली मार्गे तिचे गंतव्य स्थानक पानिपत इथं गुरुवारी आणि रविवारी 17.30 (सायंकाळी 05:30) वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे, परतीच्या प्रवासात, ट्रेन क्रमांक 07636 पानीपत-नांदेड ही ट्रेन गुरुवार आणि मंगळवारी पानिपतहून 19:00 वाजता सुटून आलेल्या मार्गानेच तिसऱ्या दिवशी सकाळी 06:00 वाजता नांदेडला पोहोचेल.
🚉✨️Special Trains between Nanded and Panipat 🚉✨@RailMinIndia @SCRailwayIndia #festivalspecialtrains #safetravel #Trending #railsewa pic.twitter.com/xrFHJREhKh
— South Central Railway (@SCRailwayIndia) October 23, 2025
गाडीचे थांबे आणि कोट संरचना :
या ट्रेनमध्ये एकूण 24 कोच असतील, ज्यामध्ये 02 सेकंड एसी कोच, 04 एसी थर्ड क्लास कोच, 13 स्लीपर कोच, 3 जनरल क्लास कोच आणि 02 एसएलआर कोच असतील. ही ट्रेन नांदेड-पानिपत दरम्यान दोन्ही दिशेनं पूर्णा जंक्शन, परभणी जंक्शन, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड जंक्शन, जळगाव जंक्शन, भुसावळ जंक्शन, खंडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, राणी कमलापती, बिना जंक्शन, वीरंगना राणी लक्ष्मीबाई झांसी, आग्रा, मथुरा, कोसी कलान आणि नवी दिल्ली स्टेशनवर थांबेल












