Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरिकांच्या एकुण १४ तक्रार वजा सूचना प्राप्त
Pune

पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरिकांच्या एकुण १४ तक्रार वजा सूचना प्राप्त

पिंपरी, ८ डिसेंबर २०२५ :- महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण १४ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे.

आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले.

आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, इ, फ, ग या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे ३, ५, ५, १ अशा एकूण १४ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या. तर ब, क, ड, ह या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एकही तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या नाहीत.

यावेळी नागरिकांनी शहरातील वाहतुकीच्या समस्या, अतिक्रमण हटविणे, गटारांची दुरुस्ती, शहरातील पथदिव्यांची दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन, आरोग्य केंद्राची स्वच्छता आदी तक्रार वजा सूचना जनसंवाद सभेत नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.

या उपक्रमामुळे नागरिकांच्या सहभागातून प्रशासन अधिक पारदर्शक व जबाबदार होईल, तसेच शहरातील नागरी सुविधांच्या उन्नतीस गती मिळेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts