Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • 300 कोटींचा टप्पा पार केलेल्या चित्रपटाला उध्वस्थ करेल..; नेमके आहे तरी काय या व्हिडिओत ?
मनोरंजन

300 कोटींचा टप्पा पार केलेल्या चित्रपटाला उध्वस्थ करेल..; नेमके आहे तरी काय या व्हिडिओत ?

Viral video creating controversy around a film that crossed the ₹300 crore box office mark

300 Crore Film Viral Video : दो दिवसांपूर्वी राजकीय विश्लेषक तथा कन्टेन्ट क्रिएटर याने एक ट्विट केले होते. या ट्विट मध्ये त्याने नाव घेता माझा एक व्हिडीओ 300 कोटींचा टप्पा पार केलेल्या चित्रपटाला उध्वस्थ करेल अशा आशयाची पोस्ट ट्विट केली होती. तो व्हिडो आता यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून ध्रुव राठीने जोरदार हल्लाबोल केला आहे.

ध्रुव राठीने या व्हिडिओला रिऍलिटी ऑफ धुरंधर असे कॅप्शन दिले असून धुरंधर हा खोटा आणि प्रोपेगेंडा म्हणजे प्रचारकी चित्रपट असल्याचे त्याने या व्हिडीओ मध्ये म्हंटलंय. यापूर्वी देखील राठीने चित्रपटात दर्शवणाऱ्या हिंसाचारावर जोरदार टीका केली होती. धुरंधर चित्रपट राजकारणाकडे झुकणारा असून हे चित्रपटाला खराब बनवत असल्याचे त्याने चित्रपटात म्हंटले आहे.

हे ही वाचा : आधी निधी अग्रवाल आता समांथा; समांथासोबत धक्काबुक्की, व्हिडीओ व्हायरल

काय आहे व्हिडीओमध्ये

हा चित्रपट खोटा आणि खराब असल्याची टीका त्याने केली आहे. याशिवाय खोटं विकण्याचा प्रयत्न दिग्दर्शक आदित्य धार याने चित्रपटात केल्याचा आरोप ध्रुव राठी याने केला आहे. चित्रपट बनवला चांगला आहे, परंतु जास्त धोकादायक असल्याचं तो म्हणतो. ताज स्टोरी आणि बंगाल फाईल्स हे चित्रपट धोकादायक नव्हते. ते बकवास चित्रपट होते. असं मत त्याने व्यक्त केले असून धुरंधर हा चित्रपट गुंतवून ठेवणारा चित्रपट असल्याचे राठीचे मत आहे.

काय होतं पोस्ट

शनिवारी ध्रुव राठी याने ट्विटरवर एक ट्विट केले होते. या पोस्ट मध्ये मी लवकरच चित्रपटावर एक व्हिडिओ रिलीज करणार असल्याचे म्हंटल होतं. हा 1 युट्यूब व्हिडिओ 300 कोटीच्या प्रोपेगेंडा चित्रपटाला उद्धवस्त करेल. या व्हिडिओनंतर वाईट अवस्था होईल. आणि ते यासाठी तयार नसल्याचंही या पोस्ट मध्ये म्हंटलं होतं. हा व्हिडिओ आज रात्री रिलीज होणार  असल्याचंही  त्याने सांगितलं होतं.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts