Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • आधी निधी अग्रवाल आता समांथा; समांथासोबत धक्काबुक्की, व्हिडीओ व्हायरल
मनोरंजन

आधी निधी अग्रवाल आता समांथा; समांथासोबत धक्काबुक्की, व्हिडीओ व्हायरल

Samantha Ruth Prabhu caught in a scuffle as viral video circulates on social media

Samantha Scuffle Video Viral : आपल्या आवडत्या नायिकेला किंवा नायकाला भेटण्यासाठी चाहत्यावर्ग प्रचंड उत्सुक असतो. म्हणूनच बऱ्याचदा जेव्हा सेलिब्रिटीस एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी किंवा चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी उपस्थित राहतात तेव्हा चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. बऱ्याचदा सेलिब्रिटींना या गर्दीचा सामना करत मार्ग काढावा लागतो. काही दिवसांपूर्वी साऊथ अभिनेत्री निधी अग्रवाल हिला या गर्दीचा अनुभव आला होता. आता हीच वेळ पुन्हा एका साऊथ अभिनेत्रीवर उद्भवली आहे.

हैद्राबाद येथे एका कार्यक्रमावेळी साऊथ अभिनेत्री समांथा रूथ प्रभू या अभिनेत्रीला प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. अभिनेत्री कार्यक्रम स्टेज पासून ते तिच्या कार पर्यंत जाण्यासाठी संघर्ष करताना दिसली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये हा संपूर्ण प्रकार रेकॉर्ड झाला आहे. काही दिवसांपूर्वी प्रभासच्या राजा साब या चित्रपटाच्या गाण्याच्या लॉन्चिंगवेळी अभिनेत्री निधी अग्रवाल या अभिनेत्रीला देखील असाच संघर्ष करावा लागला होता.

Why fans in south don’t understand boundaries even after rajasaab incident
byu/Hungry_Business592 inBollyBlindsNGossip

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये समांथा सोनेरी रंगाच्या साडी मध्ये दिसत आहे. तिच्या संरक्षणासाठी बॉडीगार्ड देखील असून ते अभिनेत्रीला कार पर्यंत घेऊन जाण्यास मदत करताना दिसत आहे. परंतु अफाट गर्दीने तिला घेराव घातल्याचे दिसून येत असून कार पर्यंत जाण्यासाठी अडचणी येत असल्याचे चित्र व्हिडीओ मध्ये दिसत आहे. या व्हिडीओ वर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून चाहते वर्गाकडून द्वेष, तीव्र निषेध वर्तवण्यात येत आहे.

नुकतेच 1 डिसेंबर रोजी समांथा रूथ प्रभू ने दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्याशी लग्नगाठ बांधली. समांथा रूथ प्रभू आणि दिग्दर्शक राज निदिमोरु या डोगाह्णचे देखील हे दुसरे लग्न होते. दोघांच्या वयात 8 वर्षाचे अंतर आहे. सामंथा लग्नानंतर पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात दिसली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts