Daya Dongre Death News : मराठी रंगभूमी मध्ये मानाचे नाव असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचा 85 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दया डोंगरे यांचा जन्म 1924 साली पुण्यात झाला होता. त्यांच्या कलेचा वारसा पिढ्यानपिढ्या चालत आला होता. त्यांच्या आई यमुनाबाई मोडक या प्रसिद्ध नाट्यअभिनेत्री तर आत्या शांताबाई मोडक गायिका होत्या. तुम्ही सर्वांनी हे नाव तर ऐकलंच असेल. दया डोंगरे यांना दोन विवाहित मुली असून मोठी मुलगी संगीता ही मुंबईत राहते, तर धाकटी अमृता बंगलोर मध्ये राहते. दया डोंगरे यांचे पती शरद डोंगरे यांचे 2014 मध्ये अकस्मात निधन झाले होते.
हे हि वाचा : पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाने केली एकाच दिवसात लाखो रुपयांची कमाई
दया डोंगरे यांनी शालेय शिक्षण घेत अभिनय देखील सुरू ठेवला. अभिनयाची आवड असलेल्या दया डोंगरे या फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धेमधून नाटकाचे सादरीकरण करत. नंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून नाट्यशास्त्र विभागातून शिक्षण घेतले. त्यांनी लग्नानंतर पतीचा पाठिंबा मिळाल्यामुळे करिअरला सुरुवात केली. आणि 1964 पासून दिल्ली येथील दूरदर्शन वर त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. त्या दूरदर्शनवर 1972 मध्ये गजरा, बंदिनी, आव्हान या कार्यक्रमांमध्ये झळकू लागल्यात. स्वामी या लोकप्रिय मालिकेत गोपिका बाईची भूमिका त्यांनी साकारली.
जेष्ठ मराठी अभिनेत्री दया डोंगरे यांनी जब्बार पटेल दिग्दर्शित उंबरठा या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. रुपेरी पडद्यावरील खास्ट सासू आणि खलनायक यांच्या भूमिका त्यांनी केल्या होत्या. त्यांनी या भूमिकेमधून त्यांची स्वतःची नवीन ओळख तयार केली. त्यांनी मायबाप, खट्याळ सासू नाठाळ सून, उंबरठा अशा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले. तर दूरदर्शनवरील मालिकांमध्ये देखील त्या झळकल्या होत्या. (Daya Dongre Death News)












