Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • Aditya Dhar | आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; 5 डिसेंबरला होणार प्रदर्शित
मनोरंजन

Aditya Dhar | आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; 5 डिसेंबरला होणार प्रदर्शित

Aditya Dhar film trailer : लवकरच धुरंधर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर सिंग आणि सारा अर्जुन हे एकत्र दिसणार आहे. आज धुरंधरचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरच्या माध्यमातून सारा अर्जुन आणि रणबीर सिंह यांची जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याने चाहत्यांच्या मनात चित्रपटाबाबत उत्सुकता दिसून येत आहे.

40 वर्षीय रणबीर सिंग आणि 20 वर्षाची सारा अर्जुन चित्रपटात एकत्र दिसणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. तेव्हा त्यांच्या वयाच्या अंतराबद्दल बोलले जात होते. परंतु जेव्हा या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला तेव्हा मात्र नेटिझन्सनी उत्सुकता शिगेला पोहोचली. आणि रणबीर सिंह सारा अर्जुन यांची जोडी पडद्यावर छान दिसत असल्याचे नेटिझन्सने मान्य देखील केले.

रणबीर सिंह ने केले सारा अर्जुनचे कौतुक

चित्रपट धुरंधरच्या ट्रेलर लॉन्चिं पत्रकार परिषदे रणवीर सिंग यांनी सारा अर्जुनाचे कौतुक केले. ते म्हणाले, “सारा, मला विश्वास बसत नाही की आपण या मंचावर आहे. तुझ्यासाठी हा किती खास क्षण आहे. आणि मी याचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे, तुझ्यासाठी अशा खास क्षणाचा भाग होण्याचा मला भाग्य आहे. सारा ही प्रतिभावान असून मला वाटते, सारा, हि या भूमिकेत उतरण्यासाठी इतर हजारो उमेदवारांना मागे टाकले आहेस. आणि असे वाटते की तू हे करण्यासाठी जन्माला आली आहेस.

धुरंधर हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट आदित्य धर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला आहे. तर या चित्रपटाचे सह निर्माता म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. या चित्रपटात रणवीर सिंग , संजय दत्त , अक्षय खन्ना , आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्यासह सारा अर्जुन आणि राकेश बेदी हे सहाय्यक भूमिकांमध्ये दिसत आहेत.

हे ही वाचा – हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझला मिळाला त्याच्या कारकिर्दीतील पहिला ऑस्कर पुरस्कार

धुरंधर चित्रपटाचे संगीत शास्वत सचदेव यांनी दिले असून गीते कुमार आणि इर्शाद कामिल यांनी ही गाणे लिहिली आहेत.चित्रपटाचे शीर्षकगीत १५ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित करण्यात आले होतेहे शीर्षक गीत  १९९५ मध्ये मुहम्मद सादिक आणि रणजीत कौर यांनी लिहिलेल्या “ना दिल दे परदेसी नु” या गाण्याचा रिमेक होता. (Aditya Dhar film trailer)

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts