Bigg Boss Marathi Season 6 contestants : प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या रिऍलिटी शो बिग बॉसची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. काल पासून बिगबॉस मराठी सिझन 6 ची सुरुवात झाली. यंदाच्या सिझनमध्ये 17 स्पर्धक सहभागी झाले आहे. हे स्पर्धक आहेत तरी कोण याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आजच्या लेखात आपण हीच नावे पाहणार आहे. दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार अशी थीम असलेल्या बिग बॉस मराठी सिझन 6 चा काल भाऊंच्या धक्क्यावर ग्रँड प्रीमिअर सोहळा पार पडला.
कशी झाली स्पर्धकांची एंट्री
काल म्हणजेच 11 जानेवारी रोजी बिग बॉस मराठी सिझन 6 चा पहिला एपिसोड पार पडला. या पहिल्या एपिसोडमध्ये स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली. त्यावेळी स्पर्धकांना दोनपैकी एका प्रवेशद्वाराची निवड करण्यास सांगितले होते. त्यावेळी काही स्पर्धकांनी शॉर्टकटचं दार निवडलं, तर काहींनी मेहनतीचा मार्ग स्वीकारला. सर्वप्रथम बिग बॉस मराठीच्या घरात सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तथा राजकारणात सक्रीय असणारी दिपाली सय्यदची एन्ट्री झाली. यावेळी दिपालीने शॉर्टकटचं दार ठोठावलं. त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ फेम सागर कारंडेनं एन्ट्री घेतली. यावेळी सागर कारंडे आणि सचिन कुमावत यांनी मेहनतीचा मार्ग निवडत घरात एंट्री केली. त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री सोनाली राऊत आणि ‘लक्ष्मी निवास’ फेम तन्वी कोलतेने घरात शॉर्टकटचे मार्ग निवडत एंट्री केली. आणि आयुष संजीवने मेहनतीचा मार्ग निवडत बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली.
हे ही वाचा : द राजा साब चित्रपट न कॉमेडी ना भयावह; जाणून घ्या चित्रपटाची 4 दिवसांची कमाई
एवढेच नाही तर यासोबतच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करण सोनावणे, गायिका प्राजक्ता शुक्रे, रोडीज गाजवणारी रुचिता जामदारनं देखी बिग बॉस च्या घरात एंट्री केली. या तिघांनी देखील शॉर्टकटचा मार्ग निवडला. याशिवाय प्रभु शेळके डॉन, अनुश्री माने, राकेश बापट, रोहन भजनकर, दिव्या शिंदे, नृत्यांगना राधा पाटील, ओमकार राऊत आणि विशाल कोटियन यांनी देळखील बिग बॉस च्या घरात एंट्री केली.
View this post on Instagram
बिग बॉस मराठी सिझन 6 मध्ये प्रवेश केलेल्या स्पर्धकांची यादी
दिपाली सय्यद, तन्वी कोलते, सचिन कुमावत, सोनाली राऊत, सागर कारंडे, आयुष संजीव, करण सोनावणे, प्रभु शेळके उर्फ डॉन , प्राजक्ता शुक्रे, रुचिता जामदार , अनुश्री माने, राकेश बापट , रोशन भजनकर, दिव्या शिंदे, राधा पाटील, ओमकार राऊत, विशाल कोटीयन या स्पर्धकांनी एंट्री केली आहे.












