Border 2 teaser release : आज विजय दिनाच्या निमित्ताने बहुप्रतीक्षित चित्रपट बॉर्डर 2 चा टिझर रिलीज करण्यात आला. हा टिझर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात युद्ध, भावनिक दृश्य देशभक्ती दर्शविण्यात आले आहे. या चित्रपटाचा टिझर सनी देओल यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बॉर्डर 2 चित्रपटात सनी देओल, वरून धवल, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित असून या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात सनी देओल यांच्या दमदार व्हाईसओव्हरने झाली.
टिझर प्रदर्शित
भारत पाकिस्थान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या भारतीय जवानांचे शौर्य, त्याग आणि जिद्द प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. चित्रपटातील वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांचे तीव्र युद्धप्रसंग, आणि युद्धाच्या गदारोळात उलगडणारे प्रेम, कुटुंबीयांशी असलेले नाते आणि वैयक्तिक संघर्ष देखील टीझरमध्ये बघायला मिळत आहे.
सनी देओल यांनी सोशल मीडियावर शेअर केला टीजर
बॉर्डर 2 चित्रपटाचा टिझर अभिनेता सनी देओल यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून “आवाज कुठपर्यंत जायला हवा…. या विजय दिवस ला वर्षातील सर्वाधिक प्रतिक्षीत टिझर साजरा करा. #border 2 23 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित” अशा आशयाचा कन्टेन्ट या टीझरसोबत लिहिण्यात आला आहे.
Awaaz kahan tak jaani chahiye… 🇮🇳🔥
This #VijayDiwas, celebrate the most anticipated teaser of the year.
🔗- https://t.co/dHVcy9fNe5#Border2 In Cinemas 23rd JanJai Hind 🇮🇳@iamsunnydeol @Varun_dvn @diljitdosanjh @ahanshetty28 #BhushanKumar #JPDutta @RealNidhiDutta pic.twitter.com/imxyLxL1TA
— Sunny Deol (@iamsunnydeol) December 16, 2025
टिझर लॉन्चिंग कार्यक्रम
बॉर्डर 2 चित्रपटाच्या टिझर रिलीज करण्यापूर्वी अहान शेट्टी यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर टिझर लॉन्चिंग कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात वरून धवन आणि अहान शेट्टी यांची उपस्थित होते. यावेळी प्रेक्षक चाहते, आणि माध्यमांसोबत विशेष चर्चा रंगल्याचे दिसले. मागील आठवड्यात या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर टीझरच्या माध्यमातून चित्रपटाची झलक प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली.
Awaaz kahan tak jaani chahiye… 🇮🇳🔥
This #VijayDiwas, celebrate the most anticipated teaser of the year.
🔗- https://t.co/rwI8A3S9Dq#Border2 In Cinemas 23rd JanJai Hind 🇮🇳@iamsunnydeol @Varun_dvn @diljitdosanjh @ahanshetty28 #BhushanKumar #JPDutta @RealNidhiDutta… pic.twitter.com/4I6cFFkupr
— T-Series (@TSeries) December 16, 2025
हे कलाकार असणार चित्रपटात
हा चित्रपट अनुराग सिंग यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या सनी देओल, वरून धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी यांच्यासह मेधा राणा, मोना सिंग आणि सोनम बाजवा यांची देखील भूमिका आहे. हा चित्रपट भूषण कुमार, जे.पी. दत्ता आणि निधी दत्ता यांनी निर्मित केला आहे.
कधी होणार चित्रपट प्रदर्शित
अनुराग सिंग दिग्दर्शित बॉर्डर 2 चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय जवानांच्या शौर्य, बलिदान आणि देशभक्तीची परंपरा पुढे नेण्यात येत असल्याचे चित्रपटाचे निर्माते यांनी सांगितले.










