Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • धर्मेंद्र यांचे अस्थी विसर्जन करण्याची सनी देओल यांची होती इच्छा; ‘या’ कारणाने देओल कुटुंबातील ‘या’ व्यक्तीने केले अस्थी विसर्जन
मनोरंजन

धर्मेंद्र यांचे अस्थी विसर्जन करण्याची सनी देओल यांची होती इच्छा; ‘या’ कारणाने देओल कुटुंबातील ‘या’ व्यक्तीने केले अस्थी विसर्जन

Dharmendra ashes immersion performed by Deol family member at Har Ki Pauri

Dharmendra ashes immersion : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते, सुपरस्टार धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांनी 89 व्या वर्षी अखेरचा स्वास घेतला. बुधवारी त्यांचे अस्थी विसर्जन करण्यात आले. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बॉलिवूड मध्ये त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे बुधवारी अस्थी विसर्जन कार्यक्रम पार पडला.

कोणी केले अस्थी विसर्जन

उत्तराखंड, हरिद्वार येथील हार की पैरी या घाटावर बुधवारी अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अस्थी विसर्जन ना बॉबी देओल नाही सनी देओल यांनी केले. तर त्यांचे अस्थी विसर्जन धर्मेंद्र यांचे नातू करण देओल यांनी केल्याची माहिती रोहित त्रयस्थ यांनी ANI शी बोलताना दिली. ते ANI सोब बोलताना म्हणाले कि, काही कारणाने सनी देओल आणि बॉबी देओल अस्थी विसर्जन कार्यक्रमात येऊ शकले नाही. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या नातूने हा विधी पार पाडला. त्यानंतर पिंडदान हा विधी देखील करण्यात आला. यावेळी धर्मेंद्र यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता.

या कारणाने सनी देओल यांनी केले नाही अस्थी विसर्जन

हे अस्थी विसर्जन सनी देओल यांना करण्याची इच्छा होती. परंतु त्यांनी अस्थी विसर्जन केले असते तर प्रचंड गर्दी जमा झाली असती. त्यामुळे धर्मेंद्र यांचे नातू आणि सनी देओल यांचे चिरंजीव यांनी अस्थी विसर्जन पार पाडले.

हे ही वाचा : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराची घाई का केली? हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन

हीमॅन म्हणून ओळख निर्माण केलेले धर्मेंद्र यांच्या पश्चात त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर, दुसरी पत्नी हेमा मालिनी, यासह सहा मुले आहे. काही काळापासून धर्मेंद्र आजारी होते. त्यांची 10 नोव्हेंबर रोजी अचानक तब्येत खराब झाली होती. त्यावेळी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

27 नोव्हेंबर रोजी मुंबई येथील ताज लँड्स एन्ड याठिकाणी सेलिब्रेशन ऑफ लाईफ या प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी सनी देओल, बॉबी देओल, करण देओल, यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले होते. या प्रार्थना सभेत धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts