Dhruv Rathee tweet on Dhurandhar : धुरंधर या आदित्य धार दिग्दर्शित चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर काही आठवड्यातच आकर्षक कमाई केल्याचे निदर्शनास आले. चित्रपटातील खलनायक अक्षय खन्ना यांची ऍक्टिंग डान्स ची चर्चा सध्या सुरु असतानाच आता एका कंटेंट क्रिएटर ने चित्रपटाच्या विरोधात हल्लाबोल केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार त्याचा एक व्हिडीओ 300 कोटींच्या चित्रपटाला उध्वस्थ करू शकतो.
राजकीय विश्लेषक , कंटेन्ट क्रिएटर ध्रुव राठी याने शनिवारी ट्विट केले. या ट्विट मध्ये त्याने चित्रपटाचे नाव न घेता हल्लाबोल केला. ‘माझा एक व्हिडीओ 300 कोटींच्या प्रोपेगेंडा चित्रपटाला उध्वस्थ करेल‘ अशा आशयाची पोस्ट त्याने ट्विटर वर शेअर केली आहे. नुकताच धुरंधर चित्रपटाने 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. यापूर्वी देखील ध्रुव राठी याने चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज नंतर चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांच्यावर टीका टिपण्णी केली होती.
काय आहे पोस्ट
शनिवारी ट्विटर म्हणजे आताचे X वर ध्रुव राठीने एक पोस्ट शेअर केली. या पोस्ट मध्ये मी लवकरच चित्रपटावर एक व्हिडिओ रिलीज करणार आहे. हा 1 युट्यूब व्हिडिओ 300 कोटीच्या प्रोपेगेंडा चित्रपटाला उद्धवस्त करेल. या व्हिडिओनंतर वाईट अवस्था होईल. आणि ते यासाठी तयार नसल्याचंही या पोस्ट मध्ये म्हंटलंय. हा व्हिडिओ आज रात्री रिलीज होणार असल्याचंही त्याने सांगितलं.
It takes 1 YouTube video to destroy a ₹300 crore propaganda film
And I guarantee you that the MELTDOWN after this video will be so bad. They’re not ready for this. Releasing tonight 😉
— Dhruv Rathee (@dhruv_rathee) December 20, 2025
या पोस्ट मध्ये त्याने चित्रपटाचं नाव जाहीर केलेलं नसलं तरीही अनेकांना चित्रपटाच्या नावाचा अंदाज वर्तवला आहे. या पोस्टच्या कमेंट बॉक्स मध्ये धुरंधरबद्दल बोलणार असल्याच्या कमेंट्स अनेकांनी केल्या आहे. हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाने भारतात 480 कोटींची कमाई केली असून जगभरात या चित्रपटाने 740 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात रणवीर सिंह ने मुख्य भूमिका साकारली असून मुख्य नायिकेच्या भूमिकेत अर्जुन सारा आहे. चित्रपटातील खलनायकाची भूमिका साकारणारे अक्षय खन्ना यांचे प्रचंड कौतुक होत आहे.
हे ही वाचा : गोला बनला मोठा दादा; भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
काय आहे चित्रपटाची कहाणी
धुरंधर चित्रपटाची कहाणी हळूहळू पुढे सरकताना दिसते. भारतात प्लेन हायजॅक आणि 2001 मध्ये संसदेवर झालेल्या गोळीबार आणि दहशतवादी हल्ल्यांवर आधारित आहे. भारतातून आपले एजेंट पाकिस्थानी अंडरवर्ल्ड, माफिया आणि गँग्सला संपवण्यासाठी पाठवतात. या चित्रपटाची कहाणी ही सत्य घटनेवर आधारित असून हळुहळु पुढे सरकते. हा संपूर्ण चित्रपट साडेतीन तसंच आहे. पण हा चित्रपट बोर न होता प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास मदत करतो. चित्रपट जसजसा पुढे जातो तशी उत्सुकता शिगेला जाते. या चित्रपटातील अभिनेत्री सारा अर्जुनचा अभिनय ठीकठाक आहे, काही ठिकाणी तिचे काम कमी पडत असल्याचे दिसतं. चित्रपटातील अक्षय खन्नाचा अभिनय देखील प्रेक्षकांना आवडत आहे. त्याचे हावभाव बोलके असल्याने तो डायलॉग पेक्षा डोळ्यांनी संवाद साधत असल्याचे काही ठिकाणी वाटते.












