Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • पहा कुठे कुणाची सत्ता; या जिल्ह्यातील नगरसेवकांची यादी आली समोर
Top News

पहा कुठे कुणाची सत्ता; या जिल्ह्यातील नगरसेवकांची यादी आली समोर

Elected corporators and political party flags after district municipal election results

nagarparishad nagarpanchayat election result 2025  : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी नुकतीच पार पडली. आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. त्यानंतर आता अनेक जिल्ह्यातील विजयी नगरसेवकांची यादी समोर येत आहे. काही ठिकाणी पराभव तर काही ठिकाणी विजय बघायला मिळत असून राज्यातील काही भागातील नगरसेवकांची यादी देखील समोर आली आहे.

या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका चार वर्षांपासून लांबल्या होत्या. त्यानंतर निवडणूक आयोगाने 2 डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संथांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुषंगाने मतदान 2 डिसेंबर रोजी पार पडले. तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. परंतु निवडणूक आयोगाने काही जिल्ह्याती निवडणूक कार्यक्रम निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांवर कोर्टात सुरु असलेल्या केसेसमुळे पुढे ढकलल्या होत्या. आणि मतमोजणीची तारीख देखील लांबणीवर पडली होती. त्यानंतर 20 डिसेंबर रोजी उर्वरित जिल्ह्यात मतदान कार्यक्रम जाहीर करण्यात आल्या. आणि 21 डिसेंबर म्हणजे आज या निवडणुकीच्या मतमोजणीचा कार्यक्रम पार पडला. आता निवडणुकांच्या निकालाची तयारी सुरु आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगरपालिकांच्या निकाल समोर आला आहे.

गडचिरोली नगर परिषद

 नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रणोती निंबोरकर विजयी

 आरमोरी नगरपरिषद

नगराध्यक्षपदी भाजपचे रुपेश पुणेकर विजयी

देसाईगंज नगरपालिका

नगराध्यक्षपदी भाजपच्या लता सुंदरकर मतांनी विजयी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विजयी नगराध्यक्ष

सिल्लोड : अब्दुल समीर – शिंदे सेना

पैठण : विद्या कावसानकर – शिंदे सेना

कन्नड : फरीनबेगम जावीद सेठ – काँग्रेस

खुलताबाद : आमेर पटेल – काँग्रेस

गंगापूर : संजय जाधव – राष्ट्रवादी अजितदादा

वैजापूर : दिनेश परदेशी – भाजप

फुलंब्री : राजेंद्र ठोंबरे – शिवसेना ठाकरे

हे ही वाचा : कुठे राष्ट्रवादी तर कुठे भाजप; जाणून घ्या प्रत्येक जिल्ह्यातील आताची ताजी अपडेट

कोल्हापूर नगरपरिषद

पेठवडगाव : काँग्रेस + स्थानिक आघाडी -विद्याताई पोळ

शिरोळ : काँग्रेस योगिता कांबळे

चंदगड : भाजप : सुनिल काणेकर

आजरा : भाजप – अशोक चराटी

हुपरी : भाजप – मंगलराव माळगे

मुरगूड : शिवसेना शिंदे – सुहासिनीदेवी पाटील

हातकणंगले : शिवसेना शिंदे – अजितसिंह पाटील

जयसिंगपूर : शिवसेना शिंदे – संजय पाटील

कुरुंदवाड : शिवसेना शिंदे – मनीषा डांगे

मलकापूर : जनसुराज्य – रश्मी कोठावळे

पन्हाळा : जनसुराज्य – जयश्री पवार

गडहिंग्लज : राष्ट्रवादी अजित पवार – महेश तुरबतमठ

कागल : अपडेट होत आहे ( संभाव्य राष्ट्रवादी अजित पवार गट – सविता माने)

इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे 14 उमेदवार विजयी

इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदी भरत शहा विजयी

अकोला जिल्ह्यातल्या 6 नगरपरिषदचा निकाल जाहीर

सहा पैकी चार ठिकाणी भाजप तर एका ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि एका ठिकाणी काँग्रेस विजयी

1) अकोट येथे भाजपच्या माया धुळे

2) हिवरखेड येथे भाजपच्या सुलभा दूतोंडे

3) तेल्हारा येथील भाजपच्या वैशाली पालीवाल

4) मुर्तीजापुर येथे भाजप चे हर्षल साबळे

5) बाळापूर येथे कॉंग्रेसच्या डॉ. आफरीन परवीन मोहम्मद जमीर

6) बार्शीटाकळी येथे वंचित बहुजन आघाडीचे अख्तर खातून

हे विजयी झाले आहेत….

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts