Dhurandhar movie leaked : काही दिवसांपासून धुरंधर या आदित्य धर दिग्दर्शित चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. कधी या चित्रपटाचे गाणे व्हायरल तर कधी अक्षय खन्ना यांची ऍक्टिंग आणि डान्स. गेल्या 5 दिवसात चित्रपटाने 150 कोटीचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशीच आकर्षक कमाई केली होती. यामुळे दिग्दर्शक आणि निर्माते आनंदी आहे. परंतु आता या चित्रपटासाठी वाईट बातमी आहे. कारण आठवड्याभरातच चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याचे समोर आले आहे.
धुरंधर चित्रपट सिनेमागृहात न पाहता ऑनलाईन लीक झाल्यामुळे प्रेक्षक फ्री मध्ये डाउनलोड करून HD प्रिंट मध्ये पाहत आहे. यामुळे चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होताना दिसत आहे. 5 डिसेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आणि काही सेकंदातच ऑनलाईन सुद्धा लीक झाला. आणि प्रेक्षकांनी हा चित्रपट ऑनलाईन डाऊनलोड करून घरीच फ्री मध्ये बघत आहे. जिला, मुव्ही रुल्ज , तामिळ रॉकर्स आणि टेलिग्राम यासारख्या पायरेटेड वेबसाईटवर 240p फुल HD क्वालिटीमध्ये धुरंधर उपलब्ध करण्यात आल्याची माहिती मिळाली.
हे ही वाचा : व्ही शांताराम चित्रपटात कोण साकारणार जयश्री ची भूमिका; जाणून घ्या
काही वर्षांपासून डिजिटल पायरसीविरोधात सरकारने कडक नियम आणि कायदे आखले होते. तरी देखील अशा पद्धतीने अनेक चित्रपट ऑनलाइन लीक होताना दिसत आहे. पायरसीमुळे फक्त धुरंधरच नाही तर अनेक चित्रपटांना मोठा फटका बसला आहे. याविरोधात अनेक निर्माते-दिग्दर्शक आणि कलाकारांनी आवाज उठवला असून अद्यापही त्याला पूर्णपणे आळा बसला नाही असं दिसून येत आहे.
View this post on Instagram
रणवीर सिंह ऐवजी अक्षय खन्नाची चर्चा
या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह ऐवजी जास्त चर्चा अक्षय खन्ना यांची सुरु आहे. धुरंधर चित्रपटातील अक्षय खन्नाचा लूक, अभिनय, डान्स, थंड नजर सर्वकाही खिळवून ठेवणारे आहे. रेहमान डकैतची भूमिका साकारणाऱ्या अक्षयवर एक अप्रतिम असे गाणे चित्रित करण्यात आले आहे. या डान्स व्हिडीओ शूट करण्याबाबत अक्षय खन्ना यांनी धुरंधरचे दिग्दर्शक यांना आणखी काही करू शकतो का असे विचारले होते. त्यानंतर होकार मिळाल्यानंतर अक्षय खन्ना ने स्वतः हा डान्स बसवून हे गाणे शूट केले होते. परंतु या गाण्याच्या शूटिंग दरम्यान अक्षय ची तब्येत अत्यंत बिघडली होती. या चित्रपटातील एका सीनमध्ये तो ‘शेर-ए-बलोच’ स्टाइलमध्ये अरबी स्टेप्स करताना दिसत आहे. या गाण्याची आणि अक्षय खन्ना यांनी केलेल्या डान्स ची सर्वत्र चर्चा सुरु आहे. आणि या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.












