मनोरंजन क्षेत्रात अभिनेता, अभिनेत्री, सिंगर्स, दिग्दर्शक कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी ते ट्रोल होतात तर कधी त्यांची वाहवा होते. आता अभिनेता आणि रिॲलिटी शो टीव्ही स्टार एजाज खान चर्चेत आला आहे. तो त्याच्या अभिनयाने नाही तर त्याच्या एका माणुसकी दर्शवणाऱ्या पोस्त मुळे चर्चेत आला आहे.
वृंदावन येथील प्रेमानंद महाराज यांची प्रकृती सध्या चिंतेचा विषय बनलेली आहे. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून यासंदर्भातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या मध्ये चा चेहरा सुजलेला, डोळे लाल आणि केस विस्कटलेले दिसत आहे. त्यात त्यांनी स्पष्ठ केले आहे कि ते आता बरे होण्यासारखे काही उरलेले नाही, त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहे. या संदर्भात मदत करण्यासाठी अभिनेता एजाज खान यांनी प्रेमानंद महाराजांना एक किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अभिनेता एजाज खान यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “प्रेमानंद महाराज हे असे व्यक्ती आहे जे कधीही कोणत्या धर्माबद्दल बोलले नाहीत, त्यांनी कधी कोणाला भडकवले नाही. मला त्यांना भेटायचं आहे. जर माझी किडनी त्यांच्याशी जुळली तर मला त्यांना माझी किडनी द्यायची आहे. त्यांच्यासाठी सर्वांनी प्रार्थना करा की, ही व्यक्ती आणखी १०० वर्षे जगो आणि आपले भले होवो, मी तुम्हाला भेटायला लवकरच येईल” अशी पोस्ट त्यांनी केली होती.
प्रेमानंद महाराज यांची शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी देखील भेट घेतली होती. या भेटीदरम्यान प्रेमानंद महाराज यांनी सांगितले होते कि, त्यांच्या दोन्ही किडन्या १० वर्षापासून निकामी आहे. तरीही ते देवाच्या नावावर आणि भक्तीच्या जोरावर जीवन जगत आहे. त्यावेळी हे ऐकून राज कुंद्रा भावूक झाले होते. त्यावेळी राज कुंद्रा यांनी त्यांची किडनी देणार असल्याचे सांगितले होते.