Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • नीरज घायवानचा ‘होमबाऊंड’ ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या श्रेणीत शॉर्टलिस्ट
मनोरंजन

नीरज घायवानचा ‘होमबाऊंड’ ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या श्रेणीत शॉर्टलिस्ट

Homebound film shortlisted for Oscars 2026 after Cannes 2025 success

Homebound shortlisted for Oscars 2026 : नीरज घायवान दिग्दर्शित होमबाउंड या चित्रपटाला आगामी ऑस्कर 2026 पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या चित्रपटाची निवड 15 चित्रपटांमधून झाली असून हा चित्रपट पुढील फेरीसाठी पात्र ठरला आहे.

होमबाउंड हा चित्रपट आगामी 98 व्या अकादमी पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट कऱण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी हा चित्रपट बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म या विभागासाठी पात्र ठरला आहे. याबाबत अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँन्ड सायन्सेस या अधिकृत संकेतस्थाळावर माहिती देण्यात आली आहे. होमबाउंड या चित्रपटासोबत 15 चित्रपटांचा देखील ऑस्कर 2026 चित्रपटांमध्ये समावेश आहे.

होमबाउंड या भारतीय चित्रपटा ईशान खट्टर आणि विशाल जेठवा यांची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट अंतिम शॉर्टलिस्टेड  यादीत असून ऑस्कर 2026 साठी पात्र ठरला आहे. या चित्रपटासोबतचा 86 देशातील आणि प्रदेशातील चित्रपट देखील पात्र ठरले आहे. ऑस्कर 2026 साठी भारतातून पात्र ठरलेल्या होमबाउंड चित्रपटाबाबत धर्मा प्रोडक्शनने बुधवारी इंस्टाग्रामवर आनंदाची बातमी शेअर केली.

या देशातील चित्रपट देखील नामांकन यादीत

भारताच्या होमबाऊंड चित्रपटासह अर्जेंटिना येथील Belen , ब्राझील चा THE Secret Agent , फ्रान्सचा It Was Just An असिसिडेन्ट, जर्मनीचा Sound of Falling यासारख्या इतर देशातील चित्रपटांना ऑस्कर 2026 साठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे.

पोस्ट शेअर करत दिली माहिती

धर्मा प्रॉडक्शनने याबाबत पोस्ट शेअर करत “98 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म साठी होमबाऊंड चित्रपट शॉर्टलिस्ट झाला आहे, जगभरातून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहेअसा आशय पोस्ट मध्ये लिहिला आहे. ANI सोबत बोलतांना AMPAS ने असे स्पष्ट केले कि, नामांकन फेरीमध्ये सर्व शाखांमधील सदस्यांना सहभागासाठी बोलाविले जाते. आणि शॉर्टलिस्ट झालेल्या सर्व 15 चित्रपट पाहणे बंधनकारक केले जाते.

हे ही वाचा : विजय दिनानिमित्त बॉर्डर 2 चा टिझर रिलीज; सनी देओल सह ‘हे’ कलाकार आहेत मुख्य भूमिकेत

काय आहे चित्रपटाचीथा

होमबाउंड या चित्रपटाची कथा ही बालमित्र शोएब (ईशान खट्टर) आणि चंदन (विशाल जेठवा) यांच्याभोवती फिरताना दिसते. चित्रपटातील हे दोन पात्र पोलीस भरतीचे स्वप्न उराशी घेऊन चालत असतात. हे स्वप्न त्यांच्या आयुष्यला दिशा देण्याचे काम करते. चित्रपटातील जान्हवी कपूरची भूमिका मैत्री, कर्तव्य आणि खास म्हणजे आजच्या या तरुण भारतासमोरील दबाव यांची भावनिक मांडणी दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट कारण जोहर, आदर पुनावाला आणि अपूर्वा मेहता यांनी निर्मित केला आहे.

होमबाउंड या चित्रपटाने यापूर्वी कान्स 2025 , TIFF मध्ये भव्य प्रेझेन्टेशन देत International Audience Choice या अवॉर्डसाठी Second Runner Up मध्ये स्थान पटकावले आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts