Mahakali movie poster : सध्या RKD स्टुडिओज आणि दूरदर्शी फिल्म मेकर प्रशांत वर्मा प्रचंड चर्चेत आहेत. कारण फिल्म हनुमानच्या माध्यमातून भारतीय सुपरहिरो असलेल्या जॉनरला नवीन ओळख मिळाली आहे. या स्टुडिओस आणि फिल्म मेकर प्रशांत वर्मा यांच्या माध्यमातून ही ओळख जॉनरला मिळाल्याचं चर्चेत आहे.
नुकताच महाकाली या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले. या पोस्टमध्ये भूमी शेट्टी मुख्य भूमिकेत असल्याचा पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचा अभूतपूर्व लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून याची प्रचंड चर्चा होत आहे. या चित्रपटाचे 50 टक्क्यांपेक्षा जास्त शूटिंग पूर्ण झाले असून महाकाली चित्रपटाच्या निर्मात्यांनी भूमी शेट्टीच्या रूपात एक नवीन कलाकाराला प्रकाश झोतात आणलं आहे
महाकाली चित्रपटातील सुपरहिरो पात्रासाठी बऱ्याच टॉप अभिनेत्रींनी इच्छा व्यक्त केली होती. परंतु निर्मात्यांनी सिनेमाच्या नावाप्रमाणे एका अशा अभिनेत्रीला निवडलं जी सिनेमाच्या स्टोरीला उत्तम अभिनयाची मोहर घालेल. आणि चित्रपटाला एका उंचीवर घेऊन जाईल.
Witness the rise of the most FEROCIOUS SUPERHERO in the universe! 🔱🔥
Introducing #BhoomiShetty as MAHA ❤️🔥 #Mahakali 🔱 @PrasanthVarma#RKDuggal @PujaKolluru #AkshayeKhanna#RiwazRameshDuggal @ThePVCU pic.twitter.com/91eU6rZVX4
— RKD Studios (@RKDStudios) October 30, 2025
महाकाली चित्रपटाच्या थरारक रूपात भूमी दिसत आहे. लाल आणि सोनेरी रंगात रंगलेली पारंपारिक दागिने आणि पवित्र चिन्हाने सजलेल्या महाकालीचा हा जबरदस्त अवतार पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याशिवाय या पोस्टर मध्ये दाखवल्याप्रमाणे तिच्या डोळ्यातील दुर्मिळ तीव्रता अनेकांच्या भुवया देखील उंचावत आहे. या पोस्टरमध्ये भूमी शेट्टीचा अभिनय आणि महाकाली चित्रपटाची कथा याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (Mahakali movie poster)
हे हि वाचा : कोण आहे आय पॉपस्टारच्या मंचावरून मन धावतंया गाण्याने सर्वांचं मन जिंकणारी राधिका भिडे
प्रशांत वर्मा यांनी सांगितलं की, हनुमान सिनेमानंतर दिव्य स्त्रीशक्तीचा सार घेऊन आम्ही महाकाली सिनेमा लवकरच प्रेषकांच्या भेटीला आणणार आहोत. या सिनेमांमध्ये इतिहास आणि पुराणातील अनेक गोष्टी पाहायला मिळतील. महाकाली हा चित्रपट ब्रम्हांडातील शक्तींबाबतची माहिती दर्शवतो. आम्हाला अभिनेत्री भूमी शेट्टीच्या निवडीबाबत देखील अभिमान आहे. परंतु जेव्हा भूमीला आम्ही या पात्रासाठी निवडले तेव्हा तिने या भूमिकेबाबत तयारी दर्शवली. आणि शूटिंगसाठी कठोर परिश्रम ही घेतले.












