Honymoon se hatya : 2025 या वर्षात मेरठ येथील हत्याकांड प्रकरण फारच चर्चेत आले होते. 4 मार्च 2025 रोजी घडलेल्या सौरभ हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. याप्रकरणात मुस्कान हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने तिच्या स्वतःच्या नवऱ्याची म्हणजेच सौरभ राजपूतची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून निळ्या ड्रम मध्ये सिमेंटच्या मिश्रणात सील केले होते. आज पुन्हा या हत्त्याकांडची आठवण झाली. कारण या गाजलेल्या हत्याकांडवर आधारित डॉक्यु सिरीज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण zee 5 ने या डॉक्यु सीरिजचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले असून या सिरीजची रिलीज देत देखील समोर आली आहे.
हे ही वाचा : 2026 या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार या खास वेबसिरीज
काय आहे पोस्ट मध्ये
ही डॉक्यु सिरीज zee 5 या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. zee 5 ने या डॉक्यु सिरीजची अधिकृत घोषणा केली असून त्याचे पहिले पोस्टर देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये निळा ड्रम दाखवण्यात आला असून सिमेंटमध्ये अडकलेला एक हात स्पष्टपणे दिसत आहे. तर या पोस्ट मध्ये Honymoon se hatya : why women kill . ” सगळं काही हॅप्पी एंडिंगसारखं वाटत होतं, पण मग ….. तसं झालेच नाही.” अशा आशय लिहिण्यात आला आहे. हि सिरीज 9 जानेवारी रोजी Zee 5 वर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
It looked like a happily ever after until… it wasn’t.#HoneymoonSeHatya premiering on 9th January, on #ZEE5#HoneymoonSeHatyaOnZEE5 #GreytIndianWedding pic.twitter.com/7UoWCeU1MT
— ZEE5Official (@ZEE5India) January 2, 2026
काय होते हे प्रकरण (Meerut case docu series first poster)
मेरठ येथील शास्त्रीनगर परिसरात घडलेले भयानक हत्याकांड प्रत्येकाच्या मनात या पोस्टच्या माध्यमातून ताजे झाले. मुस्कानने आपल्या प्रियकर साहिलच्या मदतीने सौरभच्या हत्येचा चालाखीने कट रचला होता. 26 फेब्रुवारी 2025 ला सौरभ राजपूत हा मेरठला आला. मर्चंट नेव्हीत कार्यरत असलेला सौरभ कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी घरी आला. इकडे त्याची पत्नी त्याला मारण्याचा डाव रचत होती. याची सौरभला काडीमात्र देखील भनक नसेल. सध्या या प्रकरणातील आरोपी मुस्कान आणि साहिल तुरुंगात आहे. या डॉक्यु सिरीजमध्ये थरारक, हादरवून टाकण्यात येणाऱ्या घटनेची सवसितर कहाणी दर्शविण्यात येणार आहे.








