Mouni Roy Badmaash song : सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आवडीनिवडी जोपासण्याचे विसरतो. परंतु एखाद्या गोष्टीची आवड लागल्यावर ती गोष्ट करून मिळणार आनंद हा वेगळाच असतो. आनियातून मनाला मिळणारी शांती आणि आनंद कोणत्याही सुखापेक्षा जास्त असतो. आता तुम्हीच बघा, बरेच सेलिब्रिटीस हे आपल्या अभिनयाबरोबरच त्यांचा आनंद असलेल्या गोष्टी करतात. ज्यातून त्यांना आनंद मिळतो आणि मानसिक सुख देखील. आपण आज अशाच एका अभिनेत्री बद्दल ऐकणार आहोत, जी अभिनयाबरोबरच तिला आनंद मिळणाऱ्या व्यवसायाबदल देखील चर्चेत आहे.
बरेच अभिनेता आणि अभिनेत्री अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रात देखील काम करतात. तर बरेच सेलिब्रिटी अभिनयासोबतच व्यवसायाला पसंती देतात. त्यापैकी काही सेलिब्रिटीस हॉटेल या व्यवसायाला प्राधान्य देतात तर काहींना कॅफे व्यवसाय प्रभावित करतो. मनोरंजन क्षेत्रात मलाईका आरोरानंतर मौनी रॉय या अभिनेत्रीने तिचे स्वतःचे रेस्ट्रॉरंट सुरु केले आहे. सध्या तिचे रेस्टोरंट प्रचंड चर्चेत आहे. आता या चर्चेचं कारण काय ? तर तिच्या रेस्ट्रॉरंट मध्ये मिळणारी भेळ आणि त्याची किंमत. आणि तुम्हाला या अभिनेत्रींच्या रेस्ट्रॉरंटचे मेनुकार्ड पाहून तर आश्चर्याचा धक्काच बसेल.
अभिनेत्री मौनी रॉयला जेवण, पेय आणि प्रवास करण्याची प्रचंड आवड आहे. ती भारतीय खाद्यपदार्थांची प्रचंड फॅन असल्यामुळे तिने रेस्टॉरंट उघडण्याचाच निर्णय घेतला होता. तिच्या या रेस्ट्रॉरंटमध्ये मसाला पापड पासून शेवपुरी, भेळपुरी, एवढेच नाही तर कांदा भाजी देखील मिळतात. तिच्या या रेस्टॉरंटचे नाव आहे बदमाश. या बदमाश मध्ये सर्व खाद्य पदार्थांची चव मिळते.
बदमाश हे अस्सल बॉलिवूड थीमचा फील देतो. या रेस्टॉरंटच्या भिंती छत लाइटिंग सर्व वनस्पती, पाने यांनी सजवलेले आहे. ज्यामुळे या रेस्टॉरंटमध्ये आकर्षक देखावा दिसून येतो. ज्यामुळे तुम्हाला रेस्टॉरंट मध्ये येऊन चांगला अनुभव मिळतो. मौनी रॉय ने हे रेस्टॉरंट अतिशय सुंदर पद्धतीने इंटेरियर केले असून येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला याचा हेवा वाटेल असा अनुभव आल्या शिवाय राहत नाही.
View this post on Instagram
बदमाश मध्ये आहे या खाद्यपदार्थांची मेजवानी
मौनी रॉयच्या रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमती एका वृत्ताच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. तेथील भेळपुरीची किंमत 400 रुपये एवढी आहे. रोटीची किंमत 100, कांडा भाजी 355 रुपये, कोळंबीचे पदार्थ सुमारे 795 रुपये, आणि मेनूकार्ड मधील बरेच असे पदार्थ आहे ज्याची किंमत 300 ते 800 रुपयांपर्यंत आहे. रेस्टॉरंटमधील स्वीट डिश बद्दल बोलायचं झालं तर शाही तुकडा आणि गुलाब जामून ची किंमत 410 रुपये आहे. याशिवाय मसाला शेंगदाणे, मसाला पापड, कुरकुरीत कॉर्न आणि शेवपुरी यांची किंमत 295 रुपये एवढी आहे. तर ब्रेडमध्ये तंदुरी रोटी आणि नान ची किंमत अनुक्रमे 105 रुपये आणि 115 रुपये आहे. तर अमृतसरी कुलचा 145 रुपयांना मिळतो.
मी आवर्जून भारतीय रेस्टॉरंटचा शोध घेते (Mouni Roy Badmaash song)
एका वृत्तात मौनी रॉय ने रेस्टॉरंट उघडण्यामागे असलेले कारण स्पष्ट केले होते. तेव्हा ती म्हणाली, मी भारतीय संस्कृतीतील खाद्यपदार्थांची फॅन आहे. मला भारतीय जेवण प्रचंड आवडते. जेव्हा मी ट्रॅव्हलिंग करत असते तेव्हा मी आवर्जून भारतीय रेस्टॉरंटचा शोध घेते. मला वाटतं खास करून बेंगळुरू आणि मुंबईत भारतीय रेस्टॉरंटची प्रचंड कमी आहे. त्यामुळे मला वाटले कि, बदमाश सारखे आपण काही तरी करणे ही आपल्यासाठी उत्तम संधी आहे.









