Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • ओ रोमिओ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित; स्टारकास्ट देखील आली समोर
मनोरंजन

ओ रोमिओ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित; स्टारकास्ट देखील आली समोर

O Romeo Marathi film teaser released with star cast reveal

O Romeo film teaser out : अभिनेता शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षित चित्रपटाचे दमदार असे टिझर प्रदर्शित करण्यात आले आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित रोमिओ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित कऱण्यातले आहे.

रोमिओ या चित्रपटाच्या टिझर मध्ये शाहिद कपूरचा गडद, हिंसक आणि निर्दयी असा भयावह अवतार पाहायला मिळत आहे. हा 1 मिनिट 35 सेकंदाचा टिझर रिलीज करण्यात आला असून या टिझर मध्ये चित्रपटातील मुख्य पात्रांची ओळख करून दिलीया टिझरची सुरुवात शाहिद कपूरच्या आक्रमक अवताराने होत असून अस्वस्थ करणारी देहबोली, आत दडलेला राग स्पष्टपणे दिसून येत आहे. हिंसाचारामधून घडलेला रोमिओ लढण्यास सदैव तयार असल्याचे या टिझर मधून दिसत असून अनेक ऍक्शन सीन बघायला मिळत आहे.

हे ही वाचा : oscar 2026 : कांतारा चॅप्टर 1 आणि महावतार नरसिम्हा चित्रपटांची ऑस्करच्या शर्यतीत झेप

हे कलाकार असणार चित्रपटात

या टिझर मध्ये तृप्ती डिमरी, दिशा पाटणी, विक्रांत मेस्सी, तमन्ना भाटिया, फरीदा जलाल आणि नाना पाटेकर यांची झलक दिसत असून हे सर्व पात्र कथेला वेगळी दिशा देणार असल्याचे संकेत मिळतात. या स्टारकास्ट सोबतच अविनाश तिवारी, अरुणा इराणी, हुसेन दलाल, रेश लांबा, आणि राहुल देशपांडे यांचे देखील चित्रपटात पात्र असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

पोस्टर प्रदर्शित

काल रोमिओ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्यानंतर आज या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला. या पोस्टर मध्ये त्याचा आक्रमक लूक दिसून येत होता. रक्ताने माखलेला चेहरा, जखमा, हातावर टॅटू, गळ्यात साखळ्या, जड पट्टा या सर्वांमुळे पोस्टर मध्ये शाहिद कपूर जास्तच आक्रमक भूमिकेत दिसणार असल्याचे चित्रपटात दिसत आहे. शाहिद कपूरने हे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले असून Romeo O Romeo where art thou O’ROMEO असे कॅप्शन या पोस्ट मध्ये देण्यात आले आहे.

या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

रोमिओ हा चित्रपट विशाल भारद्वाज दिग्दर्शित असून शाहिद कपूर सोबतचा हा चौथा संयुक्त प्रोजेक्ट आहे. यापूर्वी त्यांनी कमीने, हैदर, रंगून या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. हा चित्रपट साजिद नाडियावाला प्रस्तुत करणार असून नाडियावाला ग्रॅडसन एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्मित करण्यात आला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला व्हॅलेंटाईन मुहूर्तावर 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts