Shah Rukh Khan Red Passport : बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान हा नेहमी चर्चेत असतो. त्याचा चर्चेत राहण्याचा कारण कधी चित्रपट, कधी थॉट्स तर कधी आंतरराष्ट्रीय खेळी. तर बऱ्याचदा त्याच्या मुलगा आर्यन खान मुळे देखील तो चर्चेत असतो. परंतु आता किंग खान नवीन कारणामुळे चर्चेत आला आहे. कारण आता त्याला मिळाला आहे लाल रंगाचा पासपोर्ट. परंतु तुम्हाला आता प्रश्न पडला असेल हा लाल रंगाचा पासपोर्ट आहे तरी काय आणि शाहरुख खानला तो कसा मिळाला. तर जाणून घेऊया कोणाला मिळतो हा लाल रंगाचा पासपोर्ट.
आजकाल पासपोर्ट हा जवळपास 70 ते 80% लोकांकडे पाहायला मिळतो. भारतात तीन रंगांमध्ये पासपोर्ट उपलब्ध आहे. पहिला म्हणजे निळा. निळ्या रंगाचा पासपोर्ट हा बहुतेक व्यक्तींकडे बघायला मिळतो. दुसरा म्हणजे पांढरा आणि तिसरा हा लाल किंवा तपकिरी रंगाचा असतो. सहसा पांढरा आणि लाल रंगाचा पासपोर्ट सर्वांनाच दिला जात नाही. कारण या दोन्ही रंगाचे पासपोर्ट हे खास मानले जातात. भारतात फक्त काही लोकांकडेच हा पासपोर्ट उपलब्ध आहे. यामध्ये आता बॉलीवूड सुपरस्टार किंग खान शाहरुख खानची देखील नावाचा समावेश झाला आहे.

भारत सरकारकडून अत्यंत मानाच्या दर्जावर दिला जाणारा विशेष पासपोर्ट म्हणजेच हा लाल रंगाचा पासपोर्ट असतो. यामध्ये राजदूत सरकारी उच्च पदस्त अधिकारी राष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय मंत्री आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणारे मान्यवर व्यक्ती यांचा समावेश असतो. हा पासपोर्ट डिप्लोमॅटिक पासवर्ड म्हणून देखील ओळखला जातो. या पासपोर्ट धारकांना प्रवासात बऱ्याच सवलती मिळतात जसं की व्हिसा सवलत एअरपोर्टवर जलद इमिग्रेशन प्रक्रिया, राजनैतिक संरक्षण. यामुळे या पासपोर्टला खास मानलं जातं.
शाहरुख खानलाच का मिळाला पासपोर्ट
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शाहरुख खानला हा पासपोर्ट कसा काय मिळाला. तर शाहरुख खान हा फक्त अभिनेताच नाही तर तो भारताचा ग्लोबल आयकॉन आहे. जगभरात त्याचे कोट्यावधी चाहते असून अनेक देशांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून देखील त्याला ओळखले जाते. कारण त्याने सांस्कृतिक राजदूत म्हणून देखील भारताचे नाव उंचावलं आहे. याचमुळे भारत सरकारने शाहरुख खानला हा सन्मान देऊन त्याला कल्चरल डिप्लोमॅट म्हणून मान्यता दिली आहे. आता या लाल रंगाच्या पासपोर्टमुळे त्याला परदेश प्रवासात विशेष अशा सुविधा मिळतील. यामुळे भारताचा प्रतिनिधित्व करण्यासाठी अधिकृत दर्जा प्राप्त होईल.

या सुविधा मिळतात
लाल रंगाचा पासपोर्ट म्हणजे फक्त रंगाचा बदल नाहीतर सन्मान आणि जबाबदारीचे प्रतीक आहे. लाल रंगाचा पासपोर्ट असणाऱ्या व्यक्तींना विसामुक्त प्रवेश मिळतो. म्हणजेच त्यांना अनेक देशांमध्ये प्रवेशासाठी वेगळा व्हिसा घेण्याची गरज भासत नाही. इमिग्रेशन मध्ये त्यांना फर्स्ट प्राधान्य दिले जाते. त्यामुळे सामान्य प्रवाशांपेक्षा वेगळी आणि जलद प्रक्रिया होते. ह्या पासपोर्टला सरकारी दर्जा असल्याने प्रवासात सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते. एवढेच नाही तर काही वेळेस देशात देखील विशेष संरक्षण मिळतं.
global icon of cinema
शाहरुख खान हा फक्त भारतापुरताच प्रसिद्ध नसून तो UAE UK अमेरिका फ्रान्स जर्मनी मलेशिया यासारख्या देशांमध्ये देखील प्रसिद्ध आहे. याशिवाय दुबईमध्ये त्याच्या स्वतःच्या नावाचं एक बेड देखील आहे. या बेटाचे नाव आहे SRK boulevard. तर फ्रान्स सरकारने त्याला knight of the legion of honour या पदवीने सन्मानित केले आहे. एवढेच नाही तर युकेमध्ये त्याला global icon of cinema म्हणून देखील गौरवण्यात आलं आहे. म्हणूनच शाहरुख खान हा लाल पासपोर्ट साठी पात्र असल्याचं निदर्शनास येतं.

सोशल मीडियावर शाहरुख खानला लाल पासपोर्ट मिळाल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाहरुख खान वर शुभेच्छांचा वर्षाव केला जात असून एकाच्या हाताने लिहिले की किंग खान हा फक्त सिनेमांचा नाही तर भारताचा अभिमान आहे. त्याला मिळालेला हा सन्मान अगदी योग्य आहे. तर यावर दुसरा युजर म्हणतो की एस आर के ने पुन्हा एकदा सिद्ध किल्ले की तो फक्त स्टार नसून भारताचा ग्लोबल ब्रँड आहे.
हा लाल पासपोर्ट मिळवणाऱ्यांमध्ये काही प्रसिद्ध भारतीय व्यक्तींचा देखील सहभाग आहे. जसे की माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विदेशी मंत्री डॉक्टर एस जयशंकर. तर बॉलीवूड मधला पहिला अभिनेता म्हणून आता किंग खान शाहरुख खान यांचे नाव या यादीत समाविष्ट झाले आहे.

शाहरुख खानचा हा भारत सरकारकडून करण्यात आलेला सन्मानच नाही तर एक खास जबाबदारी देखील आहे. कारण आता शाहरुख खान ला परदेशात भारताचा प्रत्यक्ष प्रतिनिधित्व करावं लागेल. यामध्ये भारतीय संस्कृती बद्दल सकारात्मक दृष्टिकोन मांडणे, विविध आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची प्रतिमा जपणे आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढवणे हे तात्याचे काम असेल. शाहरुख खान साठी हा लाल रंगाचा पासपोर्ट म्हणजे त्याच्या आयुष्यात आणखीन एक माईल स्टोन असेल.











