Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • दुसऱ्यांदा आई झाली ही अभिनेत्री; सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली गूड न्यूज!
Top News

दुसऱ्यांदा आई झाली ही अभिनेत्री; सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली गूड न्यूज!

sonam kapur

Sonam Kapoor: बॉलिवूड सुपरस्टार अनिल कपूर यांची लेक सोनम कपूरने ४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली आहे. २९ मार्च २०२६ रोजी अभिनेत्री सोनम कपूरने गोंडस मुलाला जन्म दिला. नवजात बाळाचे स्वागत करत सोनमने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी सोशल मीडियाला शेअर केली.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि बिझनेसमन आनंद अहुजा यांचे कुटुंब आता आणखी मोठे झाले आहे. कारण सोनमने २९ मार्च २०२६ रोजी गोंडस मुलाला जन्म दिला असून ती दुसऱ्यांदा आई झाली आहे. सोनमने आपल्या इंस्टाग्राम पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.

हेही वाचा: मेष, मिथुनसह ‘या’ राशींच नशीब पालटणार! लगेच मिळतील श्रीमंत होण्याचे संकेत

पोस्ट मध्ये असे लिहिलं की ” अत्यंत कृतज्ञता आणि प्रेमाने भरलेल्या हृदयाने, आम्ही आनंदाने जाहीर करतो की आमच्या घरात 29 मार्च 2026 रोजी आमच्या गोंडस बाळाचा जन्म झाला. आमचं कुटुंब आता आणखी मोठं झालं आहे, आणि या नव्या आगमनाने आमच्या हृदयाला अत्यंत सुंदर रीतीने भर दिली आहे. वायू आपल्या धाकट्या भावाचं स्वागत करण्यास खूप आनंदी आहे, आणि आम्ही या नव्या जीवनासाठी खूपच भाग्यवान आहोत, ज्यामुळे आमचं घर आनंद आणि आशीर्वादाने भरून गेलं आहे. सोनम आणि आनंद या नवीन चार सदस्यांच्या कुटुंबाची सुरुवात करण्यासाठी खूपच आभारी आहेत.

https://www.instagram.com/p/DWecrbNiuQB/?utm_source=ig_embed&ig_rid=de7be539-6e62-4d92-81ad-ab5861e23b94

स्टाइलिश आणि पॉवरफुल कपल्स

सोनम आणि आनंदाची जोडी बॉलिवूडमधील स्टाइलिश आणि पॉवरफुल कपल्स मध्ये गणली जाते. २०१८ मध्ये त्यांनी लग्न केलं आणि लग्नानंतर सोनमने पर्सनल लाईफवर लक्ष केंद्रित करण्याचाच निर्णय घेतला. २०२२ मध्ये तीन पहिल्या मुलाला जन्म दिला होता, ज्याचं नाव वायू कपूर आहुजा आहे.

सोनम सोशल मीडियावर आपल्या कुटुंबाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत राहते, आणि चाहत्यांकडून सतत शुभेच्छा आणि कमेंट्स मिळत आहेत. दुसऱ्या बाळाचा आगमन ऐकून चाहत्यांमध्ये प्रचंड आनंद दिसून येत आहे. कुटुंबाच्या आनंदात सोनम आणि आनंद यांनी हा क्षण खाजगी पद्धतीने साजरा केला. या नव्या आगमनामुळे त्यांचे घर प्रेम, हसू आणि उत्साहाने भरून गेले आहे.

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts