Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • आता ‘ठरलं तर मग’ मालिका संपणार? जुईने केला मोठा खुलासा; म्हणाली की लवकरच…
ताज्या बातम्या

आता ‘ठरलं तर मग’ मालिका संपणार? जुईने केला मोठा खुलासा; म्हणाली की लवकरच…

Tharla Tar Mag Serial: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या मोठ्या ट्विस्टमुळे चर्चेत आली आहे. मालिकेत प्रियाचा खरा चेहरा येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये मालिका संपणार का, असा संभ्रम निर्माण झाला आहे. या चर्चांवर अभिनेत्री जुई गडकरी हिने मोठा खुलासा करत महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. प्रियाचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी स्टार प्रवाहच्या १३ नायिका एकत्र आल्याचे दाखवले जात आहे. या सर्वजणी मिळून प्रियाचे सत्य उघड करण्याच्या तयारीत आहेत.
मात्र, या घडामोडींनंतर प्रेक्षकांमध्ये एकच प्रश्न निर्माण झाला आहे. सुभेदार कुटूंबासमोर प्रियाचा खोटेपणा उघड झाल्यानंतर मालिका संपणार का?

हेही वाचा: परिवहन विभागाचा मोठा निर्णय! ऑटो-टॅक्सी चालकांना मिळणार ‘या’ तारखेपर्यंत मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ

या चर्चांवर अभिनेत्री जुई गडकरी हिने मोठा खुलासा करत प्रेक्षकांचा संभ्रम दूर केला आहे. सायली- तन्वी रहस्य आणि पुढे मालिकेत येणाऱ्या नव्या ट्विस्टबाबतही तिने महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

जुई गडकरीने दिले स्पष्टीकरण

या चर्चांवर अभिनेत्री जुई गडकरी हिने एका मुलाखतीत स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, ‘आता प्रियाचा खरा चेहरा समोर येणार आहे आणि हे संपूर्ण सुभेदार कुटूंबासमोर घडणार आहे. हे मालिकेतील अत्यंत महत्वाचे वळण आहे.

तिने पुढे सांगितले की, “स्टार प्रवाहवरील १३ नायिका एकत्र येऊन हा सत्याचा उलगडा करणार आहेत. त्यामुळे येणारे भाग प्रेक्षकांसाठी अत्यंत रंजक असतील.”

मालिका संपणार नाही

मालिका बंद होणार का, या प्रश्नावर जुई गडकरीने स्पष्ट केले की, ‘ठरलं तर मग’ मालिका संपणार नाही. अजून कथेत महत्त्वाचा टप्पा बाकी आहे आणि पुढे आणखी मोठे ट्विस्ट पाहायला मिळतील.

प्रेक्षकांसाठी पुढील टप्पा महत्त्वाचा

प्रियाचे सत्य उघड झाल्यानंतर कथा कोणते नवे वळण घेते, याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. मालिकेत पुढील भागांमध्ये मोठे खुलासे आणि नवे ड्रामॅटिक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts