PM Modi football with children : पश्चिम बंगालमधील (West Bengal Election) निवडणूक प्रचाराचा (Election Campaign Rally) गलबला आता शांत झाला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सिक्कीममध्ये दाखल झाले आहेत. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचाराचा गलबला आता शांत झाला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीममध्ये दाखल झाले आहेत. दोन दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आलेले पंतप्रधान मोदी मंगळवारी सकाळी गंगटोकच्या तरुणांसोबत फुटबॉलच्या मैदानावर (Football Ground) दिसले.
हेही वाचा – पवारांच्या घरी स्नेहभोजन, सुनेत्रा पवारांसह सर्व सदस्य उपस्थित राहणार.. कारण काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी फुटबॉलच्या मैदानावर उतरले
पंतप्रधान नरेंद्र मोदी फुटबॉलच्या मैदानावर उतरले आणि त्यांनी तरुणांसोबत फुटबॉल खेळला. फुटबॉलच्या मैदानातील फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, “गंगटोकच्या सुंदर सकाळी सिक्कीममधील माझ्या तरुण मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यासारखे दुसरे काही नाही.” असे लिहिले. या फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणांसोबत फुटबॉल खेळताना दिसत आहेत.
मोदींचा फुटबॉल खेळणाचा फोटो शेअर
पंतप्रधान मोदींचा तरुणांशी संवाद साधणे, फुटबॉल खेळणे आणि त्याचे फोटो शेअर करणे ही पश्चिम बंगालला आकर्षित करण्याची एक रणनीती म्हणूनही पाहिली जात आहे. वास्तविक पाहता, पश्चिम बंगाल तसेच सिक्कीममध्ये फुटबॉल खूप लोकप्रिय आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता हे भारतातील क्लब फुटबॉलचे एक प्रमुख केंद्र आहे आणि गावपातळीवरही फुटबॉल क्लब अस्तित्वात आहेत.
गोल केल्याचा आनंद साजरा केला
पश्चिम बंगालमधील फुटबॉलची लोकप्रियता यावरून लक्षात येते की, विश्वचषकासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या वेळी रस्त्यांवरील वाहतूक ठप्प होते. निवडणूक प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी फुटबॉलच्या मैदानावर उतरले, गोल केल्याचा आनंद साजरा केला आणि त्याचे फोटो शेअर केले.
सुमारे ४,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधान मोदींची एक झलक पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला मोठी गर्दी जमली होती. पंतप्रधान मोदी सिक्कीमच्या भारतासोबतच्या विलीनीकरणाच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहेत आणि सुमारे ४,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी करणार आहेत.










