• Home
  • राजकारण
  • PM मोदींचं CM योगींनी केलं तोंडभरून कौतुक; पंतप्रधानपदी 12 वर्षे पूर्ण केल्याबद्दल म्हणाले, “गरिबांचे कल्याण करत…”
Top News

PM मोदींचं CM योगींनी केलं तोंडभरून कौतुक; पंतप्रधानपदी 12 वर्षे पूर्ण केल्याबद्दल म्हणाले, “गरिबांचे कल्याण करत…”

cm yogi pm modi

CM Yogi Adityanath On PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासाठी आज (26 मे) अत्यंत खास आणि महत्त्वाचा दिवस आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची 12 वर्षे पूर्ण केली आहेत. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेत पदभार स्वीकारला होता. तर आज त्यांनी पंतप्रधानपदाची 12 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत.

हेही वाचा – महायुतीतील जागावाटपावरून तणाव? एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची गुप्त बैठक, नेमकी काय झाली चर्चा?

पंतप्रधान मोदींबाबत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

पंतप्रधानपदाची 12 वर्षे पूर्ण केल्यानिमित्त नरेंद्र मोदी यांना भाजप (BJP) आणि एनडीए NDA) यांसारख्या देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांनी शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले आहे. अनेक पक्ष आणि नेते त्यांचे अभिनंदन करत आहेत. यामध्ये आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी ट्विटद्वारे पंतप्रधान मोदींचं कौतुक करत एक विशेष संदेश दिला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “जगातील सर्वात लोकप्रिय राजकारणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ‘प्रधानसेवक’ म्हणून सेवा, सुशासन आणि लोककल्याणासाठी समर्पित 12 गौरवशाली वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. या वर्षांमध्ये गरिबांचे कल्याण हे सरकारचे प्राधान्य बनले, अंत्योदयाचे रूपांतर आत्मनिर्भरतेच्या शक्तीत झाले आणि जनसहभागाने विकासाला एका जनआंदोलनात बदलले. याच दूरदृष्टीने अशा ‘नव्या भारता’ला आकार दिला आहे जिथे महिला सक्षमीकरण, नवोपक्रम, आर्थिक प्रगती आणि सांस्कृतिक पुनर्जागरण एकत्रितपणे पुढे वाटचाल करत आहेत”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “आज भारत एक मजबूत आणि विश्वासार्ह नेतृत्व म्हणून प्रस्थापित झाला आहे, जो आपल्या सीमांवर ठाम, दहशतवादाविरोधात निर्णायक आणि जागतिक स्तरावर पूर्ण आत्मविश्वासाने उभा आहे. डिजिटल तंत्रज्ञान, लोकसंख्याशास्त्र आणि लोकशाही यांचा संगम ‘विकसित भारत 2047’ च्या दिशेने नवी गती देत ​​आहे. प्रधानमंत्री आवास, जन धन, आयुष्मान भारत, उज्ज्वला आणि स्वनिधी यांसारख्या योजनांनी विकासाला लोकांच्या जीवनात आणून विश्वास दृढ केला आहे आणि हाच विश्वास ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ प्रत्यक्षात आणत आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्धाराने पुढे वाटचाल करणाऱ्या या क्रांतिकारी प्रवासासाठी पंतप्रधानांचे मनःपूर्वक अभिनंदन”, असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts