Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Top News

“भारत आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा”, : मार्को रुबियो

Marco Rubio

Marco Rubio: अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो सध्या भारत दौऱ्यावर असून त्यांनी शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जवळपास तासभर भेट घेतली. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना रुबियो यांनी भारत-अमेरिका संबंधांबाबत मोठे वक्तव्य केले. “पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंध अतिशय खास असून ते दीर्घकालीन आहेत. भारत आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा देश आहे,” असे त्यांनी म्हटले.

रुबियो पुढे म्हणाले की, “या दोन नेत्यांमधील समन्वय आणि विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. दोघेही गंभीर आणि दूरदृष्टी असलेले नेते आहेत. ते फक्त अल्पकालीन नव्हे तर दीर्घकालीन हित लक्षात घेऊन निर्णय घेतात.”

भारत-अमेरिका व्यापार आणि संरक्षण भागीदारी मजबूत

मार्को रुबियो यांनी सांगितले की, “भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत 20 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे दोन्ही देशांतील व्यापारी संबंध अधिक मजबूत झाले आहेत. तसेच हिंद-प्रशांत क्षेत्रात संयुक्त लष्करी सरावांमुळे सुरक्षा भागीदारीलाही अधिक बळ मिळाले आहे.”

ते पुढे म्हणाले की, “भारत आणि अमेरिकेतील संबंध हे इंडो-पॅसिफिक क्षेत्राविषयीच्या आमच्या दृष्टिकोनाचा मजबूत पाया आहेत. परराष्ट्रमंत्री म्हणून माझी पहिली अधिकृत बैठक क्वाड समूहासोबत झाली होती. ही बैठक भारतात घेण्यामागे आमची बांधिलकी आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्याचा उद्देश होता.”

भारत-अमेरिका संबंध मजबूत स्थितीत

याआधी नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाचे राजदूत सर्जिओ गोर यांनीही भारत-अमेरिका संबंधांवर भाष्य केले होते. त्यांनी सांगितले की, “मजबूत भारत आणि मजबूत अमेरिका हे जागतिक स्थैर्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत झाले असून भविष्यात सहकार्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.”

500 अब्ज डॉलर व्यापाराचे लक्ष्य

सर्जिओ गोर यांनी सांगितले की, “भारतीय कंपन्यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेत केलेली 20.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक ही वाढत्या विश्वासाचे आणि आर्थिक सहकार्याचे प्रतीक आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “भारत आणि अमेरिका येत्या काही वर्षांत 500 अब्ज डॉलर द्विपक्षीय व्यापाराच्या लक्ष्याकडे वेगाने वाटचाल करत आहेत.”

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts