Modi Italy Visit Viral Photos : गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय राजकारणात (International Politics) एका जोडीनं लय भारी हवा केलीये. ती जोडी म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि इटलीच्या पंतप्रधान मेलोनी. जगासाठी हे दोन देशांचे प्रमुख असतील, पण आपल्या सोशल मीडियाच्या तरुणांसाठी हे ‘मेलॉडी’ आहेत. मागच्या वेळी जेव्हा त्यांची भेट झाली होती, तेव्हा मेलोनी (Georgia Meloni) यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता “हॅलो फ्रेंड्स, फ्रॉम मेलॉडी टीम! बस… तेव्हापासून भारताच्या गल्लीबोळातील पोरांना परराष्ट्र धोरणात रस यायला लागलाय. जो पोरगा कधी भूगोलाच्या पेपरला इटली नकाशात कुठेय ते शोधू शकला नव्हता, तो आज इटलीच्या पंतप्रधानांचे स्टेटस ठेवून फिरतोय, इतकी क्रेझ आहे.
सोशल मिडिया स्क्रोल करा, नाहीतर न्यूज चॅनेल बघा सध्या अख्ख्या इंटरनेटवर एकाच गोष्टीचा राडा सुरू आहे. विषय काय? तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी गेलेत इटलीला आणि तिथे मेलोनी मॅडम आणि मोदी साहेब यांनी जे फोटो काढून सोशल मिडीयावर टाकलेत. मेलोनी MADAM नि सोडा आपल्या मोदी साहेबांनी सुद्धा X वर फोटू टाकलेत. आणि हा विषय साधासुधा नाहीये बॉस, सध्या रोममध्ये ‘गदर’ माजलाय. मोदीजी इटलीला पोहोचले काय, आणि सोशल मीडियावर ‘मेलॉडी’ ट्रेंडचा पूर आला काय. सगळा कसा एकाच वेळी धुरळा उडालाय.
सेल्फी काढला आणि तो थेट सोशल मीडियावर पोस्ट
आता मुख्य मुद्द्यावर येऊ. मोदीजी आणि मेलोनी यांची भेट झाली. हस्तांदोलन झालं. दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर स्माईल होती. पण खरी खळबळबळ उडाली जेव्हा अधिकृत बैठकीनंतर मेलोनी मॅडमनी आपल्या मोबाईलवरून एक सेल्फी काढला आणि तो थेट सोशल मीडियावर पोस्ट केला. आणि कॅप्शन दिलं वेल कम टू रोम माय फ्रेंड. गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही, आपल्या मोदी साहेबांनी देखील ट्विटरवर मेलोनी यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केलेत. “रोममध्ये उतरल्यानंतर, काल संध्याकाळी पंतप्रधान मेलोनी यांच्यासोबत रात्रीच्या जेवणादरम्यान भेट घेण्याची आणि ऐतिहासिक कलशियमला भेट देण्याची संधी मिळाली. आम्ही विविध विषयांवर आमचे दृष्टिकोन मांडले. आज आमच्यात होणाऱ्या औपचारिक चर्चेची मी वाट पाहत आहे, ज्यामध्ये भारत-इटलीची मैत्री अधिक घट्ट करण्यावर आमचा भर असेल, अस मोदीनी म्हटलं.
Upon landing in Rome, had the opportunity to meet Prime Minister Meloni over dinner followed by a visit to the iconic Colosseum. We exchanged perspectives on a wide range of subjects. Looking forward to our talks today, where we will continue the conversation on how to boost the… pic.twitter.com/df0bDYKCdU
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2026
मोदी-मेलोनी फोटोंनी सोशल मीडियावर मोठा राडा केला
याआधीही नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यातील फोटोंनी सोशल मीडियावर मोठा राडा केला होता. मात्र आत्ताचे फोटो नुसते फोटो नव्हते, तर सोशल मीडियाचा ‘बाप’ ट्रेंड होता. मेलोनी यांच्या सोशल मीडिया हँडलवर जितके इटालियन लोक कमेंट करत नव्हते, त्यापेक्षा दहा पट जास्त कमेंट्स आपल्या भारतातली पोरं करत आहेत. जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. त्या तिथे कशा निवडून आल्या, त्यांचं राजकारण कसं आहे, याच्याशी आपल्या पोरांना काही घेणंदेणं नाही. पण त्यांना ट्रेंड मात्र तुफान केलं जातंय.
मेलोनी मॅडम फक्त मोदीजींच्या शब्दाला मान देऊन भारताला पाठिंबा देतात
मेलोनी यांनी संसदेत कडक भाषण केलं की त्याचे रील्स भारतात व्हायरल होतात. त्याला बॅकग्राउंड म्युझिक एकदम साऊथच्या चित्रपटांसारखं डेंजर लावलं जातं. सोशल मीडियावर तर अशी चर्चा असते की, मेलोनी मॅडम फक्त मोदीजींच्या शब्दाला मान देऊन भारताला पाठिंबा देतात. आता यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला, तरी एक गोष्ट मान्य करावी लागेल की, या सोशल मीडियाच्या ट्रेंडमुळे भारत आणि इटलीमधले सामान्य लोक एकमेकांच्या जवळ आलेत. दोन्ही देशांमधलं ट्युनिंग कडक जमलंय..
Thank you for the gift pic.twitter.com/7ePxbJwPbA
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) May 20, 2026
मेलोनी आणि मोदी यांच्यात तंत्रज्ञान आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावर चर्चा
इटली हा युरोपमधला एक अत्यंत शक्तिशाली देश आहे. भारताला युरोपियन युनियनमध्ये आपली पकड मजबूत करायची आहे. मेलोनी आणि मोदी यांच्यात तंत्रज्ञान आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावर मोठी चर्चा होईल. एकेकाळी ‘ऑगस्टा वेस्टलँड’ हेलिकॉप्टर घोटाळ्यामुळे भारत आणि इटलीच्या संबंधात मोठी दरी निर्माण झाली होती. तो भूतकाळ विसरून आता दोन्ही देश संरक्षण क्षेत्रात एकत्र काम करतायत. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि हायड्रोजन ऊर्जेवर काम करण्यासाठी इटली भारताला मदत करणार आहे. इटलीनं चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. भारतासाठी हा मोठा राजनैतिक विजय होता. आता भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडोअर मध्ये इटलीची भूमिका खूप महत्त्वाची आहे.
येणाऱ्या काळात भारत आणि इटलीची दोस्ती आणखी घट्ट होणार
थोडक्यात सांगायचं तर, मेलोनी जितक्या हसून मोदीजींचं स्वागत करतात, तितक्याच त्या आपल्या देशाच्या फायद्यासाठी कडक नेगोशिएशन पण करतात. आंतरराष्ट्रीय राजकारणात कुणी कुणाचा परमनंट मित्र नसतो आणि शत्रूही नसतो, तिथे फक्त देशाचा फायदा बघितला जातो. आणि सध्या भारत आणि इटली दोघांचा फायदा एकमेकांसोबत राहण्यातच आहे. मोदींचा हा इटली दौरा व्यापारी दृष्टीनं जितका यशस्वी ठरलाय, त्यापेक्षा कितीतरी जास्त तो सोशल मीडियाच्या गेममध्ये सुपरहिट ठरलाय. मोदींची देहबोली आणि मेलोनी यांचं आदरातिथ्य बघून एक गोष्ट स्पष्ट आहे. येणाऱ्या काळात भारत आणि इटलीची दोस्ती आणखी गहिरी होणार आहे. .












