Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • पंतप्रधान मोदींनी दिलं असं स्पेशल गिफ्ट की मेलोनीही झाल्या खुश, व्हिडीओ होतोय व्हायरल
Top News

पंतप्रधान मोदींनी दिलं असं स्पेशल गिफ्ट की मेलोनीही झाल्या खुश, व्हिडीओ होतोय व्हायरल

PM Narendra Modi Gifts PM Giorgia Meloni | सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे इटली (Italy) दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोजी जेव्हा इटलीमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी रोम विमानतळावर पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (PM Giorgia Meloni) उपस्थित होत्या. यावेळी जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींचं खास स्वागत केलं. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. या भेटीचा मुख्य उद्देश भारत-इटली सहकार्याला चालना देणे हा असून, त्यात भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणारा आहे.

हेही वाचा – “माझ्या मित्रा रोममध्ये आपले स्वागत आहे…”, म्हणत मेलोनींनी केलं पंतप्रधान मोदींचं खास स्वागत, दोघांच्या नवीन सेल्फीने वेधलं लक्ष

पंतप्रधान मोदींनी मेलोनींना नेमकं काय दिलं गिफ्ट?

इटली दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांची आज भेट घेतली असून त्यांना एक खास गिफ्ट देखील दिलं आहे. याबाबत मेलोनी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी मेलोनी यांना ‘मेलोडी’ ही कँडी भेट देताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींनी मेलोडी कँडी गिफ्ट केल्यानंतर मेलोनी या चांगल्याच खूश झालेल्या दिसल्या. तसेच मेलोनी यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचे आभारही मानले.

पंतप्रधान मोदींची भेट स्वीकारल्यानंतर मेलोनी यांनी त्यांचे आभार मानले. त्यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो पोस्ट करत ‘तुम्ही दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद’ अशी पोस्ट शेअर केली आहे. तसंच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींसोबत दिसणाऱ्या मेलोनी म्हणाल्या की, “पंतप्रधान मोदी माझ्यासाठी एक भेट घेऊन आले आहेत. एक अतिशय स्वादिष्ट मिठाई आहे”, असं म्हणताना त्या दिसत आहेत. सध्या मोदींचा आणि मेलोनींटा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी देखील सोशल मीडियावर जॉर्जिया मेलोनींसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, “रोममध्ये आगमन झाल्यानंतर मला पंतप्रधान मेलोनी यांना रात्रीच्या जेवणासाठी भेटण्याची संधी मिळाली, त्यानंतर आम्ही प्रतिष्ठित कोलोसियमला ​​भेट दिली. आम्ही अनेक विषयांवर आमची मते मांडली. मी आजच्या आमच्या चर्चेसाठी उत्सुक आहे, ज्यामध्ये आम्ही भारत-इटली मैत्री आणखी मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा सुरू ठेवू”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी इटलीमध्ये दाखल झाले आहेत. तर आज पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांची भेट होणार असून, दोन्ही नेते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts