Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादिवशी बंगळुरूत खळबळ; जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने 6 पोलिसांना बसला दणका
Top News

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादिवशी बंगळुरूत खळबळ; जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने 6 पोलिसांना बसला दणका

Bengaluru | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 10 मे रोजी बंगळूरला (Bengaluru) भेट दिली. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यादरम्यान बंगळूरच्या बाहेरील परिसरात जिलेटीनच्या कांड्या (Gelatin Sticks) आढळून आल्या. यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. तर या प्रकरणी आता सहा पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. बंगळूर दक्षिण रामानगर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सहा पोलिसांना थेट निलंबित करण्यात आलं आहे.

हेही वाचा – मिठी मारली, केक भरवला अन्…,अमित ठाकरेंच्या वाढदिवशी आदित्य ठाकरेंची एन्ट्री, ज्युनिअर ठाकरे बंधूंच्या बॉन्डिंगची जोरदार चर्चा

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी बंगळुरूत नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 10 मे रोजी बंगळूरला भेट देण्यासाठी गेले होते. यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी तपासणी करत असताना मुख्य कार्यक्रमस्थळापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर पदपथावर दोन जिलेटीनच्या काड्या आढळल्या. या घटनेनंतर कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार बी. वाय. विजयेंद्र यांनी पंतप्रधान मोदींच्या नियोजित मार्गावर जिलेटीनच्या काड्या सापडल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी याला सुरक्षेतील गंभीर त्रुटी असल्याचं म्हटलं आहे. यानंतर सहा पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्याने सहा पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. जोपर्यंत या घटनेचा संपूर्ण तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत हे सहाही पोलीस निलंबित राहतील, अशी माहिती रामानगर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. त्यामुळे आता या सर्व निलंबित पोलिसांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. या घटनेप्रकरणी आता सहा पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित अधिकाऱ्यांमध्ये एका उपनिरीक्षक, एका सहायक उपनिरीक्षक आणि चार हवालदारांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मिळालेल्या माहितीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) देखील तपासात सामील झाली असून आता या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts