Amit Thackeray Birthday | आज (24 मे) मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा वाढदिवस आहे. अमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त (Amit Thackeray Birthday) आज शिवतीर्थावर (Shivteerth) हजारो कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजर झाले होते. मात्र, यावेळी विशेष लक्ष वेधलं ते ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या एन्ट्रीने. आदित्य ठाकरे हे शिवतीर्थावर हजर राहत त्यांनी अमित ठाकरेंना खास शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्युनिअर ठाकरे बंधू एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळाच जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.
हेही वाचा – पाकिस्तान हादरलं! क्वेटामध्ये रेल्वे रुळावर भीषण स्फोट; 20 जण गंभीर जखमी
अमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ज्युनिअर ठाकरे बंधू आले एकत्र
मागील वर्षी मे महिन्यात मराठी मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. त्यानंतर हे ठाकरे बंधू अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. अशातच आता ज्युनिअर ठाकरे बंधूही एकत्र आल्याचं आज पहायला मिळालं. अमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही ठाकरे बंधूं एकाच फ्रेममध्ये पहायला मिळाले.
अमित ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी आदित्य ठाकरे हे शिवतीर्थावर गेले होते. यावेळी त्यांनी अमित ठाकरेंना घट्ट मिठी मारली, त्यांना केक भरवला, पुष्पगुच्छ दिला आणि फोटोही काढला. यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंचं स्ट्राँग बाँडिंग सर्वांनं दिसून आलं. तसेच दोन्ही भाऊ आज एकत्र आल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्या वाजवत घोषणाबाजी केली. यादरम्यान अमित ठाकरेंचे कुटुंबीय देखील तेथे उपस्थित होते.
अमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी खास केक आणला होता, जो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या वाढदिवसाच्या केकवर NEET पेपरफुटीवरून एक खास संदेश लिहिण्यात आला होता. “नीट हटवा, देश वाचवा”, असा मजकूर केकवर लिहिण्यात आला होता. सध्या संपूर्ण देशभरात नीट पेपरफुटीमुळे एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच अमित ठाकरे यांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी केकवर खास संदेश लिहिला होता.
दरम्यान, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची मुंबई महापालिका निवडणुकीनंतर आज पुन्हा एकदा भेट झाली. अमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ज्युनिअर ठाकरे एकत्र आल्याचं पहायला मिळालं. सध्या आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्र आल्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तर सध्या ठाकरे बंधूंच्या या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.












