Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! १७ जुलैपर्यंत ‘या’ महत्त्वाच्या गाड्या धावणार नाहीत
Top News

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! १७ जुलैपर्यंत ‘या’ महत्त्वाच्या गाड्या धावणार नाहीत

Mumbai Pune Train Cancelled

Mumbai Pune Train Cancelled: मध्य रेल्वेने (Central Railway) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई–पुणे मार्गावरील १४ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ही सेवा नेमकी किती दिवस बंद राहणार, कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि त्यामागचे कारण काय आहे, जाणून घेऊया.

मुंबई- पुणे रेल्वे मार्गावरील लोणावळा- कर्जत घाट (Lonavala Karjat Train Route) विभागात मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या दरीचा परिणाम अद्यापही रेल्वे वाहतुकीवर होत आहे. घाट विभागातील दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मध्ये रेल्वे (Central Railway) १० ते १७ जुलैदरम्यान (Train Cancellation July 2026) धावणाऱ्या १४ महत्त्वाच्या एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्या रद्द (Mumbai Pune Train Cancelled) करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दररोज या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. (Pune Railway News)

हेही वाचा: गुरु ग्रह होणार अस्त! 14 जुलैपासून ‘या’ 4 राशींच्या जीवनात येऊ शकतात मोठे बदल; जाणून घ्या नेमका प्रभाव

दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दरड हटविणे, रेल्वे रुळांची तपासणी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठीच काही दिवस रेल्वे सेवा मर्यादित ठेवण्यात आली आहे.

कोणत्या गाड्या रद्द करण्यात आले? (Mumbai Pune Train Cancelled)

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये डेक्कन एक्सप्रेस, पुणे–मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस, हुबळी–दादर एक्सप्रेस, दौंड–इंदूर एक्सप्रेस, मुंबई–हैदराबाद एक्सप्रेस आणि मुंबई–चेन्नई एक्सप्रेस यांच्यासह एकूण १४ गाड्यांचा समावेश आहे. तसेच मुंबई–कोल्हापूर–मुंबई (१० ते १७ जुलै), हडपसर–जोधपूर–हडपसर (११ ते १७ जुलै), सातारा–दादर एक्सप्रेस, दादर–सातारा एक्सप्रेस, दादर–शिर्डी एक्सप्रेस, शिर्डी–दादर एक्सप्रेस आणि विशेष मुंबई–गोरखपूर रेल्वे ठरावीक तारखांना रद्द करण्यात आली आहे. LS Marathi News Channel

इतर पर्यायी वाहतुक

गाड्या रद्द झाल्यामुळे अनेक प्रवाशांनी एसटी, खासगी बस आणि इतर पर्यायी वाहतुकीचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरही अतिरिक्त ताण निर्माण झाला असून, काही मार्गांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. व्यावसायिक, विद्यार्थी आणि नोकरीसाठी दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे. (Maharashtra Flood Impact)

रेल्वे वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत

दरम्यान, घाट विभागातील दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत केली जाईल, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीचे वेळापत्रक आणि सद्यस्थिती रेल्वेच्या अधिकृत माध्यमांवरून (Indian Railways Alert) तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts