अमरावती : अनिरुद्ध उगले
Drug trafficking in amaravati: अमरावती शहरातील अमली पदार्थ तस्करीविरोधात (Drug trafficking) गुन्हे शाखेने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत मुंबईहून )( mumbai) थेट पुरवठा करणाऱ्या तस्करासह स्थानिक आरोपीला रंगेहात अटक केली आहे. अमरावती येथील लालखडी ते नवसारी मार्गावर (Lalkhadi to Navsari Route) एमडी (मॅफेड्रोन) (Mephedrone) ड्रग्जची डिलिव्हरी सुरू असताना पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या वेळी आरोपींकडून तब्बल ११ लाख ७९ हजार रुपये किमतीचे ७८ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.
हे ही वाचा: विद्यार्थिनीची आत्महत्या: ‘मिस यू डॅडी, मम्मी’ असे शेवटचे शब्द चिठ्ठीत
आरोपीला अटक
या प्रकरणात अजिम असद शेख (Azim Asad Shaikh) (३६, रा. माहिम वेस्ट, मुंबई) आणि शेख समीर शेख आमीर (Sheikh Samir Sheikh Amir) (२५, रा. गवळीपुरा, अमरावती) यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत अजिम शेख हा मुंबईहून थेट अमरावतीत एमडीचा पुरवठा करण्यासाठी येत असल्याचे समोर आले आहे, तर समीर हा स्थानिक स्तरावर वितरणाचे काम पाहत होता.
मुद्देमाल जप्त
यापूर्वीही गुन्हे शाखेने ८ फेब्रुवारी रोजी चार आरोपींना अटक करत तब्बल २ किलो ८० ग्रॅम एमडी जप्त केली होती. तसेच बडनेरा परिसरात आणखी दोन आरोपींना पकडून त्यांच्या ताब्यातून ७६ ग्रॅम एमडी हस्तगत करण्यात आली होती. या सर्व गुन्ह्यांच्या सखोल तपासातून मुंबईतील काही युवक अमरावतीत थेट ड्रग्ज पुरवठा करत असल्याचे स्पष्ट झाले होते.
सापळा रचला
दरम्यान, पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की अजिम शेख हा शनिवारी शहरात येऊन एमडीची डिलिव्हरी करणार आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने लालखडी-नवसारी मार्गावर सापळा रचला. काही वेळातच एक ऑटोरिक्षातून समीर घटनास्थळी आला आणि दोघे व्यवहार करत असताना पोलिसांनी तत्काळ धाड टाकत त्यांना ताब्यात घेतले.
आणखी काही आरोपींचा सहभाग
सध्या दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. शहरातील वाढत्या अमली पदार्थ तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.






