मुंबई : मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. लवकरच आरे ते परेड या भुयारी मार्गावर महत्वपूर्ण बदल करण्यात येणार आहे. कारण उद्या म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी मुंबई येथील भुयारी मेट्रो 3 चे लोकार्पण करण्यात येणार आहे. हे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच लवकरच या मार्गिकेचा पहिला टप्पा उद्यापासून प्रवासासाठी सुरु करण्यात येणार आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांनी 280 फेऱ्या दररोज चालवण्याची तयारी दाखवली आहे. आरे ते कफ परेड दरम्यान भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवर उद्यापासून म्हणजेच 8 ऑक्टोबर पासून प्रवाशांची रेलचेल दिसेल. तसेच या मार्गावर दर 5 मिनिटांनी मेट्रो सेवा सुरु राहणार आहे. त्यामुळे प्रवास आणखी सुलभ होण्याच्या मार्गावर आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हणजेच एमएमआरसीने आरे ते कफ परेड या मार्गासाठी 33.9 किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका तयार केली आहे, या मार्गिकेवर एकूण 27 स्थानके असणार आहेत. त्यानुसार पहिला टप्पा उद्या प्रवासासाठी उपलब्ध होणार आहे. त्यानुसार 12.69 किलोमीटर लांबीची आरे ते बीकेसी ही मार्गिका प्रवाशांसाठी उद्यापासून खुली असणार आहे. तर दुसरा टप्पा बीकेसी ते आचार्य अत्रे चौक म्हणजे वरळी नाका पर्यंतची मार्गिका याच वर्षी पूर्ण झाली असून 9.77 किमी लांबीची हि मार्गिका 9 मे रोजी प्रवासासाठी खुली करण्यात आली होती. या दोन्ही टप्प्यांमुळे आता आरे ते आचार्य अत्रे चौक दरम्यान एकूण 16 स्थानकांवर मेट्रो सेवा विना अडथळा पूर्ण झाली आहे.
या मार्गासाठी 28 मेट्रो गाड्या तयार ठेवण्यात आल्या असून सकाळच्या सुमारास पहिली गाडी 5:55 वाजता प्रवाशांसाठी सुरु असणार आहे. तर रात्रीची शेवटची गाडी 10:30 वाजता सुटणार आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणार हि मार्गिका
या शेवटच्या टप्प्यात कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी आणि सायन्स म्युझियम या स्थानकांवर मेट्रो थांबेल. तर ही मार्गिका शहरातील प्रमुख केंद्रांना जोडेल. नरिमन पॉइंट, कफ परेड, फोर्ट, लोअर परेल, बीकेसी आणि सीप्झ यासारखी व्यावसायिक केंद्रे थेट जोडली जातील. एवढेच नाही तर उद्या उदघाटन होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 यांनाही हि मार्गिका जोडलेली आहे.