मागील महिन्यात कबुतरखाना वरून संपूर्ण वातावरण पेटले होते. यामुळे नवीन वादाला सामोरे जावे लागले होते. आता हेच प्रकरण पुन्हा नवीन वादात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कबुतरखाना हे मुंबई येथील दादर भागातील एक जागा आहे. या परिसरात कबुतरांना खाऊ घालण्यासाठी प्रचंड गर्दी केली जाते. परंतु कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने अनेकांचा जीव गेल्याची घटना देखील समोर आली आहे. याच कारणाने सुप्रीम कोर्टात हे प्रकरण ठेवण्यात आले होते. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांवर एफआयआर FIR दर्ज करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला होता आणि कबुतरखाना बंद करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टाचा निर्णय फेटाळत आता मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नवीन कबुतरखाण्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तीन मूर्ती जैन मंदिर याठिकाणी उभारण्यात आलेला कबुतरखान्याचे उद्घाटन पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे मुंबई येथील कबुतरखान्यांची संख्या 52 वर गेली आहे. कबुतरखान्याची राजधानी असलेल्या मुंबई मध्ये प्रत्येक वार्डात कबुतरखाना उभारण्यात यावा अशी इच्छा देखील उद्घाटन प्रसंगी लोढा यांनी व्यक्त केली आहे.
दिगंबर जैन या समाजाच्या वतीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे ही जागा कबुतरखान्यासाठी उपलब्ध करण्यात आली. मुंबई येथील कबुतरखाने बंद होत असतानाच दिगंबर जैन समाजाणे पुढाकार घेऊन त्यांच्या मालकीच्या जागेवर कबुतरखाना सुरु करण्यात आला आहे. याठिकाणी या समाजची 9 एकर जागा असून याठिकाणी सर्व प्राणी आणि पक्षी संचार करू शकतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या कबुतरखाना बंद करण्याच्या आदेशानंतर कायदेशीर मार्ग काढून मुंबई येथे पहिला कबुतरखाना सुरु केल्यामुळे तुम्हाला नेहमीच अभिमान असेल असे ते या उदघाटन प्रसंगी बोल्ट होते.
ही जागा राष्ट्रीय उद्यानाचाच एक भाग असून याठिकाणी सर्व प्राणी पशु पक्षी यांचा वावर आहे. प्रत्येक वार्डात एक कबुतरखाना उभारण्याची माझी इच्छा आहे अशी आशा लोंढा यांनी व्यक्त केली. तर मुंबई येथे कबुतरखाना उभारण्यासाठी प्रॉब्लेम असल्यामुळे राष्ट्रीय उद्यान हे ठिकाण निवडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
काय होते प्रकरण
मुंबई येथील दादर भागात असलेल्या कबुतरखान्यावरून नुकताच वाद निर्माण झाला होता. या ठिकाणी असलेल्या कबुतरखान्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा तक्रारी निर्माण झाल्या होत्या या कबुतराच्या त्रासाला कंटाळून नागरिकांनी कबूतरखाना बंद करण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने कबूतर खाना बंद करण्यावर आणि कबुतरांना खाण्यास देणाऱ्यांवर एफआयआर दर्ज करण्यात येईल असा निर्णय दिला होता. यावरून जैन समाजाकडून विरोध दर्शविण्यात आला होता. यावेळी जैन समाजाने कबूतरखाना तिथेच असावा आम्ही त्याची जबाबदारी घेऊ अशी भूमिका घेतली होती. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेवर प्रचंड प्रमाणात वाद झाल्यानंतर हे प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात गेले होते.
उच्च न्यायालयाचा निर्णय
उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर कबुतरांच्या गोष्टीमुळे अनेक लोकांना फुफ्फुसाचे आजार होत असल्याचे निदर्शनास आणले होते, यावरून माणसांचे आरोग्य हे धोक्यात असल्याचं न्यायालयाने सांगितले. माणसांच्या आरोग्यावर परिणाम दिसून येणार असल्यास या प्रकरणावर गंभीर विचार करणे गरजेचे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने सांगितले. यानंतर दादरच्या कबूतर खाण्यातील कबुतरांना खाण्यास देण्यासाठी तूर्तास बंदी घालण्यात आली असून या संबंधित तज्ञांची समिती देखील नेमण्यात आली असून लोकांच्या हरकती आणि सूचनांशिवाय हा निर्णय नको असे निर्देश मुंबई महानगरपालिकेला न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच कबुतरखाने बंद करण्याबाबत आदेश दिले होते.
आरोग्यावर होतो परिणाम
कबुतरांच्या विष्ठेतून हिस्टोप्लाझ्मोसिस व क्रिप्टोकॉक्कोसिस यासारख्या बुरशीजन्य आजारांचा धोका निर्माण होतो. यामुळे खोकला, श्वास, घेण्यास त्रास, दमा यासारखी लक्षणे दिसू लागतात. कबुतरांच्या पिसांमुळे allergic rhinitis म्हणजे शिंक, नाक वाहणे, डोळे खाजणे यासारख्या ऍलर्जी उद्भवू शकतात. तसेच Bird Fancier’s Lung नावाचा ऍलर्जिक फुफुसांचा आजार होण्याचा धोका उद्भवतो. यासह बॅक्टेरियल इन्फेक्शन, त्वचारोग यासारख्या समस्या उद्भवतात.