मुंबईतील ठाणेकरांसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. कारण ठाणेकरांसाठी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो ट्रेन सुरु करण्यात आली आहे. यामुळे आता होत असलेली वाहतूक कोंडी कमी होईल.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर मेट्रो 4A’ ची ट्रायल रन करण्यात आली असून याठिकाणी बऱ्याच अडचणींवर मात करून हा मार्ग पूर्ण करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे मेट्रो ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊन ठाणेकरांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
सध्या वडाळा ठाणे कासारवडवली परिसरात मेट्रो ४ चे काम सुरु आहे. हे काम शेवटच्या टप्प्यात असून या मार्गाचे गायमुखपर्यंत (मेट्रो 4A) विस्तारीकरण देखील टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. आज घोडबंदर येथील गायमुख ते पूर्व द्रुतगती मार्गावरील कॅडबरी जंक्शनपर्यंत म्हणजे 13 किमी पर्यंत रन ट्रायल घेण्यात येईल. तसेच, 10.5 किमी लांबीचा ‘कॅडबरी जंक्शन ते गायमुख’ हा महत्त्वाचा टप्पा पूर्णत्वाच्या जवळ असून, ट्रायल रन आणि सुरक्षा मंजुरी मिळाल्यानंतर वर्षाच्या अखेरपर्यंत तो प्रवाशांसाठी सुरू होण्याची अपेक्षा आहे.
वीस वर्षांपूर्वी आम्ही ठाण्यासाठी मेट्रोची मागणी करत आंदोलन केले होते. त्यावेळी आम्हाला निलंबितही व्हावे लागले होते. त्या आंदोलनामुळेच ही मेट्रो मंजूर झाली आणि आज त्याचे फलित म्हणून ट्रायल रन सुरू होत आहे. यामुळे ठाणेकरांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळाली आहे. असे मत मुक्झ्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
या स्थानकांवर धावणार मेट्रो
ठाणे मेट्रोची 10 स्टेशन निश्चित झाली असून कॅडबरी, माजीवाडा, कपूरबावाडी, मानपाडा, टिकूजी – नी -वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासरवाडावली, गव्हाणपाडा , गायमुख या स्टेशनवर मेट्रो धावणार आहे.
मेट्रो 4 ही 32.32 किमी लांबीची आहे, मेट्रो 4A ही 2.7 किमी लांबीची मार्गिका आहे. या दोन्ही मार्गिकांवर एकूण 32 स्टेशन असून वडाळा ते कासारवडवलीपर्यंतचा विस्तारित मार्ग तीन टप्प्यांत तयार होत आहे, त्यातील सुमारे 80% काम पूर्ण झाले आहे.
कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन हा पहिला टप्पा डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून 2026 मध्ये कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर आणि 2027 मध्ये वडाळा हा शेवटचा टप्पा तयार होईल.
यावेळी, कासारवडवली ते गायमुख पर्यंतच्या ग्रीन लाइन 4A विस्ताराचे सुमारे 90 % काम पूर्ण झाले असून, या वर्षाच्या अखेरीस तो सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे शहरातील पहिली मेट्रो या वर्षाच्या शेवटी सुरू होऊ शकते, तर वडाळापर्यंत मेट्रोसाठी ठाणेकरांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.