Leopard scare in Aundh : पुणे शहरात बिबट्याचा शिरकाव झाला असून बिबट्याने दहशत माजवली आहे. काही आठवड्यापासून बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना समोर येत आहे. या घटनांमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आता बिबट्याने गावातून पुणे शहरात पलायन केल्याची चर्चा रंगली आहे. अशातच आता औंध भागात बिबट्याने दर्शन दिले आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार पुणे शहरातील औंध भागात असलेल्या सिंध सोसायटीच्या परिसरात पहाटेच्या सुमारास बिबट्या आढळला. बिबट्याने पहाटेच दर्शन दिल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडल्याचे पाहायला मिळाले. सिंध सोसायटीच्या परिसरात लावण्यात आलेल्या सिसिटीव्हीमध्ये बिबट्याची हालचाल निदर्शनास आली. ही घटना सुमारे पहाटेच्या 4 वाजता असल्याची शक्यता आहे. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच वन विभागाने आणि रेस्क्यू टीमने बिबट्याची शोध मोहीम सुरू केली आहे.
हे ही वाचा : लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार
पहाटे 4 नंतर या बिबट्याची कोणतीच हालचाल दिसून न आल्यामुळे आता वन विभागाने त्याला शोधण्यासाठी थर्मल ड्रोनचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. वन विभाग लवकरच बिबट्याला पकडणार असून शोध मोहीम सुरू आहे. बिबट्या औंध भागात आढळल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरातील नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन पोलिसानी केले आहे.












