पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पुण्यात काल मध्यरात्री पासून भयंकर घटना घडत आहे. कोंढवा परिसरात ATS चे सर्च ऑपरेशन सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे पोलिसांसह संयुक्त सर्च ऑपरेशन काळ पुण्यातील कोंढवा भागात राबविण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र पोलीस , पुणे पोलीस, केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा या सर्वानी मिळून संयुक्त ऑपरेशन सुरु करण्यात आले. यावेळी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी देखील सुरु आहे. या संपूर्ण कारवाईमुळे कोंढवा शहरात मोठी खळबळ माजली आहे.
पुणे पोलिसांनी आणि या संयुक्त निवडण्यात आलेल्या पथकाकडून कोंढवा परिसरातील संशयितांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या पथकामध्ये पुणे पोलीस आणि एटीएसचे जवळपास 350 कर्मचारी या भागात तैनात करण्यात आले. हे सर्च ऑपरेशन 25 ठिकाणी राबविण्यात आले. हि मोहीम राबविण्यामागे दहशदवादी नेटवर्कशी संबंधित असल्याची शक्यता आहे.
बुधवार पासून पूण्यातील कोंढवा भागाला छावणीचे रूप आल्याचे दिसत होते. यासंदर्भातील माहिती पुणे पोलिसांना आणि एटीएसला अगोदरच प्राप्त झाली होती. या पार्श्वभूमीवर, एटीएस अधिकारी यांच्यासह पुणे पोलिसांनी कोंढवा भागात संयुक्त कारवाई सुरू केली. या कारवाईच्या माध्यमातून या पथकाने कोंढवा भागात 25 ठिकाणी छापेमारी केली. याठिकाणावरून काही संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आणि काही जणांची कडक चौकशी करण्यात आली.